पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश
मुंबई: मानखुर्द येथील राज्य शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टाटा पॉवरच्या ताब्यातील जमिनींवरील अतिक्रमणे हटवून ती जागा चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या मूळ उद्देशासाठी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राज्य सरकार आणि अमेरिकेच्या 'क्लीव्हलँड क्लिनिक'मध्ये सामंजस्य करार मुंबई : महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात तब्बल ...
मानखुर्द येथील अतिक्रमित झालेल्या जागेसंदर्भात पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह मुंबई महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, महिला व बालविकास, टाटा पॉवर यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.मानखुर्द परिसरातील महामार्गालगत नव्याने उभारली जात असलेली बेकायदेशीर गोदामे, उच्चदाब वीजवाहिन्यांखाली सुरू असलेली बांधकामे आणि विविध स्वरूपातील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करुन ते हटविण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.शेलार यांनी दिले. तसेच या भागातील गॅस पाइपलाइन आणि उच्चदाब वीजवाहिन्यांच्या सुरक्षितता क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत वापरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
MUMBAI : महाराष्ट्र सरकारने 2024 ते 2026 या कालावधीत मुंबईत जन्म प्रमाणपत्रांमध्ये करण्यात आलेल्या 19,734 दुरुस्त्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सरकारने ...




