Wednesday, June 10, 2026

Fifa World Cup 2026 Prize Money : विश्वविजेत्यावर होणार पैशांचा वर्षाव ! प्रत्येक पात्र संघ कोट्यवधी रुपये जिंकेल; कोणाला किती कोटी रुपये मिळतील?

Fifa World Cup 2026 Prize Money : विश्वविजेत्यावर होणार पैशांचा वर्षाव ! प्रत्येक पात्र संघ कोट्यवधी रुपये जिंकेल; कोणाला किती कोटी रुपये मिळतील?

मुंबई : फुटबॉल जगतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे फिफा विश्वचषक. फिफा विश्वचषक २०२६ उद्यापासून म्हणजेच ११ जूनपासून रोजी गुरुवारी सुरू होईल. विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे तीन देश संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावर्षी प्रथमच, स्पर्धेत ४८ संघ सहभागी होत आहेत. मैदानातील सामन्यांपलीकडे, बक्षीस रकमेबद्दलही बरीच चर्चा सुरू आहे. फिफाने या वर्षीच्या विश्वचषकासाठी ६५५ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ६२४० कोटी रुपये) इतक्या विक्रमी बक्षीस निधीची घोषणा केली आहे. परिणामी, ही स्पर्धा इतिहासातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक ठरेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.विशेष म्हणजे, स्पर्धेत केवळ पात्र ठरणाऱ्या संघालाही इतकी मोठी रक्कम दिली जाणार आहे की ती अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांच्या विजेत्यांनाही मिळत नाही.

फिफा विश्वचषक विजेता संघाला किती बक्षीस मिळणार ?

फिफा विश्वचषक 2026 जिंकणाऱ्या संघाला 50 दशलक्ष डॉलर (सुमारे 476 कोटी रुपये) बक्षीस दिले जाणार आहे. अर्जेंटिने 2022 साली कतारमध्ये झालेला विश्वचषक जिंकाला होता. त्यावेळी अर्जेंटिनाला 42 दशलक्ष डॉलर मिळाले होते. यावेळी ही रक्कम वाढवण्यात आली आहे.

कोणाला किती बक्षीस?

स्थान बक्षीस रक्कम (डॉलर) भारतीय चलनात

विजेता - 50 मिलियन (₹476 कोटी) उपविजेता - 33 मिलियन ₹314 कोटी तिसरे स्थान - 29 मिलियन ₹276 कोटी चौथे स्थान - 27 मिलियन ₹257 कोटी 5वे-8वे स्थान - 19 मिलिया ₹181 कोटी 9वे-16वे स्थान - 15 मिलियन ₹143 कोटी 17वे-32वे स्थान -  11 मिलियन ₹105 कोटी 33वे-48वे स्थान - 9 मिलियन ₹86 कोटी

क्रिकेट विश्वविजेत्यापेक्षा फिफा विश्वचषक पात्र संघाची कमाई

क्रिकेटच्या तुलनेत फुटबॉलमध्ये विश्वचषकातून मिळणारी कमाई स्पष्टपणे अधिक लक्षणीय आहे. २०२३ च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम १० दशलक्ष डॉलर्स होती, ज्यामध्ये विजेत्या ऑस्ट्रेलियाला ४ दशलक्ष डॉलर्स आणि उपविजेत्या भारताला २ दशलक्ष डॉलर्स मिळाले. याउलट, फिफा विश्वचषकासाठी केवळ पात्र ठरलेल्या संघांनाही ९ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ८६ कोटी रुपये) दिले जातात. यावरून हे दिसून येते की, फिफा विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांची कमाई ही क्रिकेट विश्वचषक विजेत्याला मिळणाऱ्या रकमेपेक्षा जास्त असते.(sports)

 
View this post on Instagram
 

A post shared by FIFA World Cup (@fifaworldcup)

४८ संघामुळे बक्षीस निधीत वाढ

फिफा विश्वचषक २०२६ हा या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वचषक मानला जात आहे, कारण यावेळी या स्पर्धेत ४८ संघ सहभागी होणार आहेत. अधिक सामने, वाढलेले प्रेक्षक आणि प्रायोजकांकडून मिळणारा महसूल यामुळे फिफाने संघांवर पैशांचा वर्षाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा