Jalgoan : जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीविरोधात ( Illegal gutka smuggling) अन्न व औषध प्रशासनाने मोठी धाडसी कारवाई केले आहे. या कारवाईत तब्बल २१ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संशयित वाहनाचा सलग दोन दिवस पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील गुटखा तस्करीच्या साखळीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या कारवाईदरम्यान गुटख्याने भरलेली पिकअप व्हॅन जप्त करण्यात आली असून, वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात (Industrial Estate Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता या संपूर्ण रॅकेटमागील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू झाला आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान हुतात्मा झाल्याने संपूर्ण देश ...
नेमकी घटना काय ?
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर जळगाव (Jalgoan ) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती अन्न सुरक्षा विभागाला मिळाली होती. यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी आरा खालकर यांना वरिष्ठ स्तरावरून सूचना मिळताच विशेष पथक तयार करण्यात आले. संशयित वाहनावर नजर ठेवण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम सुरू केली.
मुक्ताईनगरमार्गे जळगावमध्ये येणाऱ्या संशयित पिकअप व्हॅनचा क्रमांक प्रशासनाकडे आधीच उपलब्ध होता. वाहन जिल्ह्यात पोहोचण्याआधीच त्याचा मागोवा घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी सलग दोन दिवस पुरनाड तपासणी नाक्यावर तैनात होते. संशयित वाहन नाक्यावरून पुढे गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला आणि तातडीने पोलिसांनाही माहिती देण्यात आली.
Mumbai : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. यापुढे ...
यानंतर औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत धनके (Chandrakant Dhanke) आणि त्यांच्या पथकाने रिलायन्स पेट्रोल पंपासमोर (Reliance Petrol Pump) सापळा रचत संबंधित पिकअप व्हॅन अडवली. एमएच १९- सीएक्स ३२८० क्रमांकाच्या पिकअप वाहनाची कसून तपासणी केली असता, त्यामध्ये ‘विमल’ गुटख्याच्या तब्बल ५८ गोण्या आढळून आल्या. अधिकाऱ्यांनी बाजारभावानुसार या गुटख्याची किंमत २१ लाख ८१ हजार ६०० रुपये असल्याचे सांगितले आहे.
मुख्य सूत्रधार कोण ?
प्राथमिक माहितीनुसार, हा गुटखा जिल्ह्यातील विविध भागांत विक्रीसाठी आणला जात होता. त्यामुळे आता या अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधार, माल पुरवठादार आणि वितरण नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त तपास सुरू केला आहे. जप्त करण्यात आलेला गुटखा आणि वाहन प्रशासनाने ताब्यात घेतले असून, अटक करण्यात आलेल्या चालकाची सखोल चौकशी सुरू आहे.
Nashik : नाशिककरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला आणि प्रत्यक्षात मात्र रखडलेला ‘टायरबेस्ड मेट्रो ...
शाळा, कॉलेज परिसरात राजरोस विक्री
गुटखा विक्रीवर राज्यात बंदी असतानाही शाळा, महाविद्यालय परिसर, बसस्थानके आणि रेल्वे स्टेशन परिसरात राजरोसपणे विक्री होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अवैध गुटखा विक्री आणि वाहतुकीविरोधात आणखी कठोर कारवाया करण्याचा इशारा दिला आहे. या मोठ्या कारवाईनंतर जळगावातील गुटखा तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, एफडीए आणि पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.





