विरार : विरार (Virar) तालुक्यातील मांडवी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काशीद कोपर येथील कुलस्वाई माता मंदिराजवळील डोंगराळ भागात एका ३४ वर्षीय तरुणाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, मंदिर परिसरात फोटोशूट करत असलेल्या एका तरुणाने फोटोला झूम केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आणला. (Virar News)
Nashik : नाशिक जिल्ह्यातील 8 लाख 61 हजार पुस्तकांची प्रतीक्षा कायम
Nashik : शाळेचा पहिला दिवस म्हटलं की शाळेतून मिळणारी नवी कोरी पुस्तके समोर येतात. पण नाशिकच्या शाळांना यंदा पुस्तके मिळण्याचे गणित जरा अवघड दिसतंय. ...
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दक्ष पाटील हा तरुण कुलस्वाई माता मंदिर परिसरात छायाचित्रण करत होता. यावेळी त्याने डोंगराळ भागाकडे मोबाईलचा कॅमेरा झूम करून पाहिले असता एका झाडाला व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. हा प्रकार लक्षात येताच त्याने तात्काळ मांडवी पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पाहणी केली असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तपास करण्यात आला असता त्याच्याकडील आधार कार्डावरून त्याचे नाव लालमोहन पारस चौहान (वय 34) असे असल्याचे समोर आले. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी मांडवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Chief Minister Devendra Fadnavis : डहाणू 'लव्ह जिहाद'प्रकरणी एसआयटी स्थापन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस महासंचालकांना आदेश
मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींसोबत घडलेल्या ...
दरम्यान, दुर्गम डोंगराळ भागात हा मृतदेह होता. त्यामुळे मोबाईल कॅमेऱ्याचा झूम वापरून हा प्रकार निदर्शनास आला नसता, तर मृतदेह अनेक दिवस तिथेच राहिला असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.