NITESH RANE : अवैध मासेमारीविरोधातील कारवाई आणखी तीव्र करा मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
MUMBAI : "राज्यातील सागरी सीमांमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी ड्रोन आधारित देखरेख यंत्रणा अधिक सक्षम करून कारवाईची ...
Meghana Sakore-Bordikar : रायगड महावितरणची अपूर्ण कामे मान्सून पूर्वी गतीने पूर्ण करावीत; १०० केव्हीचे २५ ट्रान्सफॉर्मर देण्याचे निर्देश
MUMBAI : रायगड जिल्ह्यातील महावितरणची अपूर्ण असणारी सर्व कामे मान्सून सुरू होण्याअगोदर गतीने पूर्ण करावीत. अलिबाग तालुक्यातील आवास ते रेवदंडा परिसरात ...
पारंपारिक मच्छीमार महिलांना मिळणार गमबूट आणि हँडग्लोज
मंत्रालयात पार पडलेल्या दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने'अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय योजनांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांचा (डीपीआर) आणि अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये मच्छीमार महिलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा विचार करून त्यांना कामाच्या ठिकाणी हँडग्लोज (हातमोजे) आणि गमबूट उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, मरोळ मच्छीमार मार्केटचा आधुनिक विकास करण्याबाबतही चर्चा झाली. तसेच, मासेमारी बंदीच्या काळात प्रत्यक्ष समुद्रात जाणाऱ्या क्रियाशील मच्छिमारांना आर्थिक सहाय्य देण्याच्या योजनेची सद्यस्थिती यावेळी तपासण्यात आली.
MARINA PROJECT : मच्छीमारांना विश्वासात घेऊनच 'मरीना' प्रकल्प पूर्ण करणार- मंत्री नितेश राणे यांची ग्वाही
MUMBAI : "मुंबईतील कफ परेड येथे साकारण्यात येणारा प्रस्तावित 'मरीना' प्रकल्प हा मुंबईच्या सागरी पर्यटन, जलवाहतूक आणि किनारी पायाभूत सुविधांच्या ...
मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन होणार
- सागरी क्षेत्रातील देखरेखीसाठी आणि 'महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमा'च्या कठोर अंमलबजावणीसाठी आधुनिक ड्रोन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. याशिवाय, कोळी बांधवांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी 'महाराष्ट्र सागरी व भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ' स्थापन करण्याची प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
- या बैठकीत विभागीय प्रशिक्षण केंद्रांची स्थापना, आंतरराज्य अभ्यास दौरे, निमखारे पाण्यात सुपर-इंटेन्सिव्ह कोळंबी संवर्धन, समुद्री शैवाळ बीज निर्मिती केंद्र उभारणी, जेट्टी दुरुस्ती आणि ससून डॉक सामंजस्य करार या विषयांवर सादरीकरण करण्यात आले.
- बारामती तालुक्यातील शिरसुफळ जलाशयातील पिंजरा पद्धतीचा मत्स्यसंवर्धन प्रकल्प आणि पेनटाकळी जलाशयातील एकात्मिक पथदर्शक प्रकल्पाच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. मच्छीमार समुदायासाठी पर्यावरणीय जलजनक तंत्रज्ञानाचा पायलट प्रकल्प राबवण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच अंतिम केला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.



