Sunday, June 7, 2026

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'
NAVI MUMBAI : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर CINTAA च्या अध्यक्षा पूनम ढिल्लों यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी या वादावर भाष्य करताना CINTAA चे महत्त्व आणि कलाकारांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या संघर्षावर प्रकाश टाकला.

रणवीर सिंग वादावर पूनम ढिल्लों यांचे मत:

रणवीर सिंगवर लावण्यात आलेली बंदी आणि त्यानंतरच्या घडामोडींवर बोलताना पूनम ढिल्लन म्हणाल्या की, "रणवीर हा एक परिपक्व कलाकार आहे. तो जाणूनबुजून कोणाला इजा पोहोचवणारा नाही. त्याने झालेल्या नुकसानीची भरपाई आणि कराराची रक्कम परत केली, ही गोष्ट खूप सकारात्मक आहे. अनेक कलाकार असे करत नाहीत. CINTAA आपल्या सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. वादात तिसऱ्या व्यक्तीने हस्तक्षेप केल्याने गोष्टी बिघडल्या होत्या, परंतु आता हे प्रकरण सामंजस्याने मिटल्याचा आनंद आहे."

CINTAA ची भूमिका आणि हस्तक्षेप:

स्टार्स विरुद्ध सामान्य कलाकार: मोठ्या स्टार्सना स्वतःचा कायदेशीर सल्ला घेता येतो, मात्र ज्या कलाकारांना मानधन मिळत नाही किंवा जे १८-२४ तास काम करण्यास भाग पाडले जातात, अशा गरजूंना CINTAA नेहमीच ताकद देते. FWICE आणि CINTAA मधील फरक: FWICE हे एक फेडरेशन आहे, तर CINTAA ही कलाकारांच्या वैयक्तिक हक्कांसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी काम करणारी एक कायदेशीर घटनात्मक संस्था आहे.

कलाकारांच्या 'कामगार' दर्जासाठी लढा:

पूनम ढिल्लों यांनी मांडलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कलाकारांना मिळणारी 'मान्यता'. त्या म्हणाल्या, "आम्ही नोकरी करणारे नाही आणि आमचा मालकही निश्चित नाही. त्यामुळे कामगार कायद्यांतर्गत आम्ही कोणत्या श्रेणीत बसतो, हे ठरवणे मोठे आव्हान होते. पहिल्यांदाच, आम्ही माहिती व प्रसारण मंत्री आणि कामगार मंत्र्यांकडे पाठपुरावा करून 'दृकश्राव्य' (Audio-Visual) क्षेत्रातील कलाकारांना 'कामगार' म्हणून स्वतंत्र ओळख मिळवून दिली आहे. ही आमच्या कार्यकाळातील सर्वात मोठी उपलब्धी आहे."

कलाकारांचा सर्जनशील सहभाग:

पटकथा आणि निर्मितीच्या प्रक्रियेत कलाकारांचा सक्रिय सहभाग असणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे ढिल्लन यांनी नमूद केले. "जर एखादा अभिनेता भूमिकेत सहज नसेल, तर तो न्याय देऊ शकत नाही. हा सहभाग सुरुवातीच्या टप्प्यावरच असावा, जेणेकरून नंतर समस्या उद्भवणार नाहीत," असे त्यांनी स्पष्ट केले.  
Comments
Add Comment