IND vs AFG Test : अफगाणिस्तानवर विजय मिळाला तरी WTC मध्ये गुण मिळणार नाही; टीम इंडियासाठी कसोटी केवळ सरावाची!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ 6 जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताची बाजू वरचढ आहे. पण या सामन्यात विजय मिळवूनही टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) गुणतालिकेत कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे हा सामना जिंकला तरी भारताच्या WTC अंतिम फेरीच्या शर्यतीवर काहीही परिणाम होणार नाही.


WTC गुण का नाही मिळणार ?


यामागचे प्रमुख कारण म्हणजे अफगाणिस्तानचा संघ सध्या WTC 2025-27 चक्राचा भाग नाही आहे. त्यामुळे भारत-अफगाणिस्तान यांच्यातील ही कसोटी अधिकृत आंतरराष्ट्रीय सामना असला तरी त्याचे गुण WTC गुणतालिकेत मोजले जाणार नाहीत. WTC स्पर्धेत केवळ नऊ संघांचा समावेश आहे. त्यात अफगाणिस्तानचा सहभाग नाही.भारत सध्या WTC च्या गुणतालिकत सहाव्या स्थानावर आहे. भारताला अंतिम फेरीत जाण्यासाठी उर्वरीत सर्व सामन्यात जिंकण्याची गरज आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना मात्र गुणांच्या दृष्टीने फायदाचे ठरणार नाही. तरीही या कसोटीला महत्त्व आहे कारण, युवा कर्णधार Shubman Gill ला आपले नेतृत्व सिद्ध करण्याची ही शेवटची संधी आहे. या कसोटी सामन्यात अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी श्रीलंका आणि न्यूझीलंड दौऱ्यांपूर्वी क्षमता तपासण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. 2018 मध्ये झालेल्या पहिल्या भारत-अफगाणिस्तान कसोटीत भारताने डाव आणि 262 धावांनी विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा भारतीय संघ मोठ्या विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार असला, तरी WTC गुणतालिकेत मात्र त्याची नोंद होणार नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना रोमांचक असला, तरी भारताच्या WTC मोहिमेसाठी तो केवळ तयारीचा भाग ठरणार आहे.



अफगाणिस्तान विरुद्ध भारतीय संघ


कर्णधार: शुभमन गिल
उपकर्णधार: केएल राहुल
फलंदाज: यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल
यष्टिरक्षक: ऋषभ पंत, ध्रुव जुरेल
ऑलराउंडर्स : नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुथार, हर्ष दुबे
गोलंदाज : कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, गुरनूर ब्रार

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील