Rumesh tharanga : नीरजलाही टाकलं मागे! श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेची कमाल; डायमंड लीगमध्ये रचला इतिहास

मुंबई : श्रीलंकेच्या युवा भालाफेकपटू रुमेश थरंगा पाथिरागेने रोम डायमंड लीग 2026 मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याच्या एका थ्रोने संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष त्याने वेधून घेतले आहे. अवघ्या 23 वर्षांच्या रुमेशने 92.62 मीटर लांब भाला फेकत केवळ स्पर्धेचाच विक्रम मोडला नाही, तर भारताच्या स्टार खेळाडू नीरज चोप्रालाही मागे टाकले आहे.ऐतिहासिक कामगिरीमुळे रुमेश 90 मीटरचा टप्पा पार करणारा आशियातील चौथा खेळाडू झाला आहे. यापूर्वी हा पराक्रम तैवानच्या चेंग चाओ-त्सन (Cheng Chao-tsun) (91.36 मी.), अर्शद नदीम (Arshad Nadeem) (92.97 मी.) आणि नीरज चोप्रा (90.23 मी.) यांनी केला होता. रुमेशने हा विक्रम करीत क्रीडा विश्वाचे लक्ष्य वेधले आहे.



रुमेशच्या 92.62 मीटर थ्रोमुळे झालेले नवीन विक्रम


१. श्रीलंकेचा नवा राष्ट्रीय विक्रम


२. २०२६ मध्ये सर्वाधिक मोठा थ्रो करण्याचा जागतिक विक्रम


३. रोम डायमंड लीगचा ऐतिहासिक विक्रम


३. आशियातील दुसरा सर्वात मोठा थ्रो


४. पुरुषांच्या भालाफेकीच्या इतिहासातील 21वा सर्वोत्तम थ्रो


विशेष म्हणजे, या स्पर्धेत नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम सहभागी नव्हते. रुमेशने दुसऱ्याच प्रयत्नात 92.62 मीटरचा विक्रमी थ्रो केला. त्यानंतरचे त्याचे चार प्रयत्न फाऊल झाले. मात्र स्पर्धेत त्याच्या विक्रमा जवळ कोणीही येऊ शकला नाही. तर स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर Anderson Peters 83.89 राहिला.





क्रिकेट ते भालाफेक असा अनोखा प्रवास


श्रीलंकेतील अनेक तरुणांप्रमाणे रुमेशलाही सुरुवातीला क्रिकेट खेळण्याची आवड होती. अंडर-18 स्तरावर तो ताशी 134 किमी वेगाने गोलंदाजी करत होता. मात्र, थाळीफेक आणि गोळाफेकपटू असलेल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याने 2017 पासून भालाफेकीचा सराव सुरू केला. आज त्याने जागतिक स्तरावर मोठा विक्रम केला आहे.दरम्यान, भारताचा युवा भालाफेकपटू सचिन यादवने (Sachin Yadav) रोम डायमंड लीगमध्ये पदार्पण केले. त्याला 79.18 मीटरचीच फेक करता आली. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 86.27 मीटर इतकी आहे.

Comments
Add Comment

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत ICC चा बडगा सुरूच; खात्यात जमा झाला डिमेरिट पॉईंट

Colombo : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने जर्सीवर टेप लावून तो नंबर का लपवला? चाहतेही चक्रावले, उलटसुलट चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या दुलीप ट्रॉफीतील पदार्पणामुळे चर्चेत आहे. अवघ्या १५

UP T20 League Rinku Singh : ८-८ ओव्हरच्या सामन्यात रिंकू सिंहचा धुमाकूळ; ४१४.२९ च्या स्ट्राइक रेटने ठोकल्या २९ धावा!

UP T20 League Rinku Singh : यूपी टी२० लीग २०२६ मध्ये रिंकू सिंहने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली आहे. स्पर्धेतील

India vs Sri Lanka 2nd Test : जयस्वाल-फर्नांडोच्या वादानंतर आणखी ड्रामा; विकेट पडताच श्रीलंकन खेळाडूचा संताप, मैदानावर नेमकं काय घडलं?

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळही वाद आणि नाट्यमय

Jaiswal, Fernando : आयसीसीची यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडोवर दंडात्मक कारवाई

कोलंबो : दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानावर झालेल्या झटापटीनंतर भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि

INDvsSL : श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीवर भारताची मजबूत पकड

कोलंबो : भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आपले स्थान मजबूत केले आहे. देवदत्त पडिक्कलच्या शतकानंतर