मुंबई : भारतीय क्रिकेट संघ 6 जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताची बाजू वरचढ आहे. पण या सामन्यात विजय मिळवूनही टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) गुणतालिकेत कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे हा सामना जिंकला तरी भारताच्या WTC अंतिम फेरीच्या शर्यतीवर काहीही परिणाम होणार नाही.
WTC गुण का नाही मिळणार ?
यामागचे प्रमुख कारण म्हणजे अफगाणिस्तानचा संघ सध्या WTC 2025-27 चक्राचा भाग नाही आहे. त्यामुळे भारत-अफगाणिस्तान यांच्यातील ही कसोटी अधिकृत आंतरराष्ट्रीय सामना असला तरी त्याचे गुण WTC गुणतालिकेत मोजले जाणार नाहीत. WTC स्पर्धेत केवळ नऊ संघांचा समावेश आहे. त्यात अफगाणिस्तानचा सहभाग नाही.भारत सध्या WTC च्या गुणतालिकत सहाव्या स्थानावर आहे. भारताला अंतिम फेरीत जाण्यासाठी उर्वरीत सर्व सामन्यात जिंकण्याची गरज आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना मात्र गुणांच्या दृष्टीने फायदाचे ठरणार नाही. तरीही या कसोटीला महत्त्व आहे कारण, युवा कर्णधार Shubman Gill ला आपले नेतृत्व सिद्ध करण्याची ही शेवटची संधी आहे. या कसोटी सामन्यात अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी श्रीलंका आणि न्यूझीलंड दौऱ्यांपूर्वी क्षमता तपासण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. 2018 मध्ये झालेल्या पहिल्या भारत-अफगाणिस्तान कसोटीत भारताने डाव आणि 262 धावांनी विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा भारतीय संघ मोठ्या विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार असला, तरी WTC गुणतालिकेत मात्र त्याची नोंद होणार नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना रोमांचक असला, तरी भारताच्या WTC मोहिमेसाठी तो केवळ तयारीचा भाग ठरणार आहे.
मुंबई : श्रीलंकेच्या युवा भालाफेकपटू रुमेश थरंगा पाथिरागेने रोम डायमंड लीग 2026 मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याच्या एका थ्रोने संपूर्ण क्रीडा ...
अफगाणिस्तान विरुद्ध भारतीय संघ
कर्णधार: शुभमन गिल उपकर्णधार: केएल राहुल फलंदाज: यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल यष्टिरक्षक: ऋषभ पंत, ध्रुव जुरेल ऑलराउंडर्स : नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुथार, हर्ष दुबे गोलंदाज : कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, गुरनूर ब्रार





