World Environment Day 2026 : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड येथे होणार १६ हजार वृक्षांची लागवड

- शुक्रवारी ५ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ


- मुंबईकर नागरिकांनी या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका आणि अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिरुट’ या नागरी वन पुनर्स्थापना उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कांजूरमार्ग क्षेपणभूमी येथील कचरा प्रक्रिया केंद्र येथे शुक्रवारी ५ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या अंतर्गत, कांजूरमार्ग क्षेपणभूमी परिसरात सुमारे १६ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमात नागरिकही येथे येऊन वृक्षारोपण करू शकतील, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. (World Environment Day 2026)


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हाती घेण्यात आलेला हा उपक्रम मुंबईतील पर्यावरण आणि हरितीकरणासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार आहे. या अंतर्गत नागरिकही कांजूरमार्ग क्षेपणभूमी येथे शुक्रवारी ५ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान स्वतः येऊन वृक्ष लागवड करू शकतील. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे आणि पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (World Environment Day 2026)



घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रम अंतर्गत कांजूरमार्ग क्षेपणभूमी परिसरात १६ हजार नवीन वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये सातपेक्षा अधिक स्थानिक व पर्यावरणास अनुकूल वृक्षप्रजातींचा समावेश असेल. याठिकाणी आधीपासून अस्तित्वात असलेल्या १२,८०० वनस्पतींसोबत ही वृक्षलागवड करण्यात येणार असून त्यामुळे मुंबईच्या हरित क्षेत्रात मोठी भर पडणार आहे. (World Environment Day 2026)


‘रिरुट’ या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईच्या पर्यावरण संवर्धनाला चालना मिळण्याबरोबरच शाश्वत आणि हरित भविष्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळेल. या उपक्रमात नागरिकही येथे येऊन वृक्षारोपण करू शकतील, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. (World Environment Day 2026)

Comments
Add Comment

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी

Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; धावत्या ट्रेनबाहेर महिला लटकताना कॅमेऱ्यात कैद

Mumbai local : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमधील एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर

Loose Oil Ban Update : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी २०११ पासूनच, अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण; व्यापारी संघटनांच्या मागण्या फेटाळल्या

मुंबई : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंध हा महाराष्ट्र शासनाने किंवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २०२६

Cab vs Auto : बोरीवली स्टेशनबाहेर कॅबचालकाला धमकी? व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Mumbai : एका व्हायरल व्हिडिओमध्ये, मुंबईतील बोरीवली स्टेशन ईस्टच्या प्रवेशद्वारावर एक ऑटोचालक एका कॅबचालकाला

Viral Video : आता काय बोलायचं ? चक्क फ्लायओव्हरच्या उंच खांबावर कुटुंबाने थाटला संसार; व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ

उंचच उंच फ्लायओव्हरच्या काँक्रीट खांबावर एका कुटुंबाने आपला संसार थाटल्याचा एक १५ सेकंदांचा व्हिडिओ सध्या