Viral Video : आता काय बोलायचं ? चक्क फ्लायओव्हरच्या उंच खांबावर कुटुंबाने थाटला संसार; व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ

उंचच उंच फ्लायओव्हरच्या काँक्रीट खांबावर एका कुटुंबाने आपला संसार थाटल्याचा एक १५ सेकंदांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला खांबाच्या कपारीवर कपडे वाळत घालताना दिसत असून, दोन पुरुष शेजारी बसलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे, कोणतीही शिडी किंवा लिफ्ट नसतानाही तिथे टीव्ही, पाण्याचे हंडे आणि रोजच्या वापरातील इतर घरगुती सामान अगदी व्यवस्थित मांडलेले दिसत होते. 'लिफ्ट नसलेला पहिला मजला' अशा मिश्किल कॅप्शनसह हा व्हिडिओ नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत होता.



भारत ते नायजेरिया; चर्चा अन् दाव्यांचे पेव




हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरुवातीला तो भारतातील असल्याचे सांगून देशातील गरिबीवर भाष्य केले जात होते. परंतु, व्हिडिओतील गाड्यांचे मॉडेल्स आणि लोकांचा पेहराव यावरून काही युजर्सनी शंका उपस्थित केली. त्यानंतर एआय टूल 'ग्रोक'च्या (Grok) हवाल्याने हा व्हिडिओ नायजेरियातील लागोस शहरातील असल्याचा आणि तिथल्या घरांच्या टंचाईचा परिणाम असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, स्थानिक नायजेरियन युजर्सनी असा कोणताही प्रकार प्रत्यक्ष घडला नसल्याचे सांगत हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला.



फॅक्ट चेक अन् एआयचा (AI) बनावट खेळ


या व्हायरल क्लिपची तांत्रिक तपासणी केली असता एक मोठे सत्य समोर आले. एआय डिटेक्टर्सद्वारे तपासणी केली असता, हा व्हिडिओ ९७ टक्के एआय-निर्मित (AI-Generated) असल्याचे सिद्ध झाले. व्यावहारिकदृष्ट्या विचार केल्यास, शिडी, दोरी किंवा कोणत्याही साधनांशिवाय इतक्या उंच खांबावर टीव्हीसारखे जड सामान आणि पाण्याचे हंडे नेणे निव्वळ अशक्य आहे. मूळ चित्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून फेरफार केला गेला आणि हा बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला.



डोळ्यांवर सहज विश्वास ठेवू नका!


सध्याच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) सर्रास वापर करून हुबेहूब वाटणारे काल्पनिक व्हिडिओ बनवणे अत्यंत सोपे झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर डोळे विस्फारून टाकणारे किंवा थक्क करणारे व्हिडिओ दिसल्यास त्यावर लगेच विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल. डोळ्यांनी पाहिलेली प्रत्येक गोष्ट खरीच असेल असे नाही, हेच या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Justice Sunil Shukre : न्या. सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची पदाची शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे (Justice Sunil Shukre) यांनी मंगळवारी राज्याच्या

CM Devendra Fadnavis : मलईदार खात्यांवर वर्षानुवर्षे कब्जा करणारे ३१४ अधिकारी रडारवर

- मुख्यमंत्री कार्यालयाकडून यादी तयार; राजकीय वरदहस्त असलेल्या अधिकाऱ्यांवर करडी नजर मुंबई : मंत्रालय आणि राज्य

Vaishya Vani Community : वैश्य वाणी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक; मंत्री अतुल सावे यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

मुंबई : वैश्य वाणी समाजातील पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी

BMC : रस्ते अभियंत्यांना महापालिकेने खड्डे शोधण्यासाठी रस्त्यावर पिटाळले

आगमन, विसर्जन मार्ग चालत जावून पाहणी करण्याचे दिले निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायांचे आगमन येत्या

Ganesh Murti Safety : कार्यशाळेतून निघणाऱ्या मोठ्या गणेशमूर्तींवर पोलिसांची नजर

फिटनेस स्ट्रॅबिलिटीनंतरच आगमन मिरवणुकीचा मार्ग करणार खुला मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत सध्या गणरायांच्या

Cooper Hospital : कुपर रुग्णालयातील एमआयसीयू खाटांची संख्या पोहोचणार ३५वर

- नवीन २५ खाटांचा एमआयसीयू कक्षाची केली जाणार उभारणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात