कल्याण : सोलापूर-कल्याण दरम्यान धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये (Siddheshwar Express) झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या दागिने चोरीप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील दहा आरोपींपैकी यापूर्वी तीन आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली होती. आता पोलिसांनी पुणेकर उर्फ शिवया डिकोले याला अटक केली असून त्याच्याकडून ₹१ कोटी २७ लाख किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. सहा महिन्यांपूर्वी एक व्यावसायिक आपल्या मुलीसोबत दागिने विक्रीसाठी सोलापूरला गेले होते. ते दागिने घेऊन मुंबईकडे परतत असताना ही चोरी झाली होती.
पश्चिम बंगाल : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत झालेल्या फुटीची चर्चा देशभर झाली होती. आता पश्चिम बंगालमध्येही (West Bengal) तशाच ...
आरोपींकडून ₹१.६२ कोटींची सोन्याची बिस्किटे जप्त
तपासादरम्यान शिवया डिकोले याच्याकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी सुमारे ₹१ कोटी २७ लाख किमतीचे सोने (Gold) जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलिसांनी चार आरोपींकडून एकूण ₹१ कोटी ६२ लाख किमतीची सोन्याची बिस्किटे हस्तगत केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीनंतर आरोपींनी दागिने वितळवून त्यांचे सोन्याच्या बिस्किटांमध्ये रूपांतर केले होते. पुरावे नष्ट करण्यासाठी आणि चोरीच्या मालाची ओळख पटू नये यासाठी त्यांनी दागिन्यांचे सोन्याच्या बिस्किटांमध्ये रूपांतर केले .
या प्रकरणाचा तपास कल्याण रेल्वे गुन्हे शाखेकडून सुरू असून अटक आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. अद्याप या गुन्ह्यातील आणखी सहा आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांना अजूनही सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचे दागिने हस्तगत करायचे आहेत. कोट्यवधी रुपयांच्या या चोरीमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, फरार आरोपींच्या अटकेनंतर या गुन्ह्याचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.






