Indonesia : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूचे इंडोनेशिया ओपन २०२६ मधील आव्हान संपुष्टाक आले आहे. दक्षिण कोरियाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल आणि विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन आन से यंगने तिला २१-१७, २१-१४ अशा सरळ गेम्समध्ये पराभूत केले. सलग दुसऱ्या आठवड्यात सिंधू आन से यंगकडून पराभूत झाली आहे.जकार्ता येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात, पीव्ही सिंधूने काही वेळा प्रभावी कामगिरी केली, परंतु ती संपूर्ण सामन्यात ती कामगिरी कायम ठेवू शकली नाही. दक्षिण कोरियाची स्टार बॅडमिंटनपटू आन से यंगने महत्त्वाच्या क्षणी उत्तम नियंत्रण दाखवत २१-१७, २१-१४ असा विजय मिळवला.
मुंबई : फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup 2026) 11 जूनपासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या संयुक्त यजमान पदाखाली खेळला जाणार आहे. कतारमध्ये झालेल्या २०२२ ...
गेल्या आठवड्यात सिंगापूर ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीतही सिंधू आन से यंगकडून पराभूत झाली होती. सलग दुसऱ्या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या बॅडमिंटनपटूने तिचे संपुष्टात आणले आहे. या पराभवामुळे आन से यंगविरुद्ध सिंधूचा रेकॉर्ड आणखी निराशाजनक झाला आहे. त्यांच्यातील सामन्यांमध्ये सिंधूला सलग दहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, या भारतीय बॅडमिंटनपटूला जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या बॅडमिंटनपटूविरुद्ध अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही.गेल्या काही वर्षांपासून दुखापती आणि चढ-उतार होणाऱ्या फॉर्ममुळे त्रस्त असलेल्या सिंधूसाठी हा हंगाम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. इंडोनेशिया ओपनमध्ये तिचा प्रवास लवकर संपला असला तरी, आगामी मोठ्या स्पर्धांमध्ये ती पुनरागमनाची आशा बाळगून असेल. दरम्यान, आन से यंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ती सध्याच्या सर्वात अव्वल महिला बॅडमिंटनपटूंपैकी एक आहे.





