मुंबई : फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup 2026) 11 जूनपासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या संयुक्त यजमान पदाखाली खेळला जाणार आहे. कतारमध्ये झालेल्या २०२२ वर्ल्डकपनंतर फुटबॉलसच्या जगात अनेक मोठे बदल झाले आहेत. २०२२ ते २०२६ दरम्यान फुटबॉल जगात काही दिग्गजांनी युरोपला राम राम केले , तर काही नवीन सुपरस्टार आले. त्यामुळे 2026 चा वर्ल्ड कप हा नव्या आणि जुन्या पिढीच्या संघर्षाचा मंच ठरणार आहे. त्यामुळे या वर्ल्ड कपकडे सर्व फुटबॉल चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे.
मेस्सीने युरोप सोडला, पण जादू कायम
2022 विश्वचषक जिंकल्यानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार Lionel Messi याने युरोपियन फुटबॉलला अलविदा केले. तो अमेरिकेतील Inter Miami क्लबमध्ये गेला. मात्र मेस्सीने अमेरिकेतही आपला दबदबा कायम ठेवत 100 हून अधिक सामन्यांत तब्बल 90 गोल केले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली इंटर मियामीने लीग्स कप, सपोर्टर्स शिल्ड आणि MLS कप अशी महत्त्वाची विजेतेपदे जिंकली आहेत
यमाल नवीन सुपरस्टार !
मेस्सी युरोपमधून बाहेर पडत असताना स्पेनमध्ये एका नव्या सुपरस्टारचा जन्म झाला. म्हणजेच Lamine Yamal याने अवघ्या 15 व्या वर्षी पदार्पण करून जगाचे लक्ष वेधले. 18 व्या वर्षापूर्वीच त्याने ला लिगा आणि युरो स्पर्धांमध्ये चांगली काम़गिरी केली आहे. अनेक तज्ज्ञ त्याला मेस्सीचा वारसदार मानत आहेत. २०२६ च्या वर्ल्ड कपमध्ये स्पेनसंघाचा सर्वात मोठा सुपरस्टार ठरेल असं म्हटले जात आहे.
रोनाल्डो 1000 गोल मारण्याच्या जवळ
Cristiano Ronaldo याने 2022 वर्ल्डकपनंतर सौदी अरेबियातील Al Nassr क्लबमध्ये प्रवेश केला. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही त्याची गोल करण्याची भूक कायम आहे. रोनालडो आपल्या करियर मधील 1000 गोलांचा टप्पा गाठण्याच्या जवळ आला आहे. फिफा वर्ल्ड कप २०२६ हा त्याच्या करियरमधील सहवा वर्ल्ड कप ठरणार आहे.
नेमारची दुखापतींची मालिका
Neymar साठी मागील चार वर्षे फारशी चांगली ठरली नाहीत. सततच्या दुखापतींमुळे त्याला क्लब आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खुप कमी सामने खेळू शकला आहे. २०२२ वर्ल्ड कपनंतर त्याने देश आणि क्लब स्तकावर मिळून केवळ ६३ सामने खेळले आहेत. ब्राझीलच्या चाहत्यांना मात्र अजूनही त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.
हॅरी केन-सर्वोत्तम फॉर्ममध्ये
Harry Kane सध्या जगातील सर्वात धोकादायक स्ट्रायकर्सपैकी एक मानला जात आहे. त्याने जर्मनीच्या FC Bayern Munich क्लब कडून खेळताना गोलांचा पाऊस पाडला आहे. यामुळे इंग्लंड चाहत्यांना केनपासून मोठ्या कामगिरीती अपेक्षा आहे.
प्रशिक्षकांवर मोठी जबाबदारी
यंदाच्या वर्ल्ड कपपूर्वी अनेक दिग्गज संघांनी अनुभवी क्लब प्रशिक्षकांची निवड केली आहे.
- Carlo Ancelotti यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझील मैदानात उतरणार आहे.
- Thomas Tuchel इंग्लंडच्या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत.
- Julian Nagelsmann जर्मनीला विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न करताना दिसणार आह
नव्या युगाचा विश्वचषक
2022 मध्ये मेस्सीच्या हातात वर्ल्ड कप ट्रॉफी पाहायला मिळाली होती. आता 2026 मध्ये फुटबॉल एका नव्या वळणावर उभा आहे. मेस्सी, रोनाल्डो आणि नेमार यांसारख्या दिग्गजांचा हा शेवटचा वर्ल्ड कप ठरू शकतो, तर यमालसारख्या नव्या सुपरस्टार्ससाठी हा स्वताला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी ठरू शकते.






