Mumbai Pre-Monsoon Rains : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; पहिल्याच सरींनी मुंबईकरांची धावपळ

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना अखेर पावसाने दिलासा दिला आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर मुंबईसह पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ‘यलो अलर्ट’नुसार शहरात पावसाची सुरुवात झाली असून सकाळच्या गर्दीच्या वेळी अचानक वाढलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. (Mumbai Pre-Monsoon Rains)


मध्यरात्रीपासूनच शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही भागांत रिमझिम सरी कोसळण्यास सुरुवात झाली होती. पहाटेपासून पावसाचा जोर वाढत गेला आणि पूर्व उपनगरांतील भांडुप, मुलुंड, विक्रोळी परिसरात मुसळधार सरी बरसल्या. मध्य मुंबईतील दादर, परळ, माटुंगा तसेच इतर भागांतही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. परिणामी वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Mumbai Pre-Monsoon Rains)



वसई-विरार परिसरातही सकाळपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले, तर कामावर आणि शाळा-महाविद्यालयांकडे निघालेल्या नागरिकांना पावसामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला. काही ठिकाणी वाहतूक मंदावल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (Mumbai Pre-Monsoon Rains)


दरम्यान, राज्यातील यंदाच्या पावसाबाबत ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी आश्वासक अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात काही भागांत सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाची शक्यता असली तरी एकूण मान्सून सुमारे ९८ टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. सध्या एल निनोची परिस्थिती सक्रिय नसल्याने आणि भारतीय महासागरातील हवामान निर्देशांक सकारात्मक दिशेने सरकत असल्याने मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. (Mumbai Pre-Monsoon Rains)



गेल्या २४ वर्षांपासून स्वतः विकसित केलेल्या ‘साबळे मॉडेल’च्या आधारे डॉ. साबळे दरवर्षी १ जून रोजी मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर करतात. यंदाच्या अंदाजात राज्यातील १७ जिल्हे आणि ८४ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग, हवेचा दाब आणि इतर हवामान घटकांचा अभ्यास करून हा अंदाज तयार करण्यात आला असून त्यात सुमारे पाच टक्के त्रुटीची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. (Mumbai Pre-Monsoon Rains)


तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता मान्सूनच्या स्थिर आगमनाची प्रतीक्षा करावी. सुरुवातीच्या टप्प्यात कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. दरम्यान, मुंबईत पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Mumbai Pre-Monsoon Rains)

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून