Devendra Fadnavis : नागरिकांच्या सोयीचे मंत्रालयीन विभाग जाणार 'एअर इंडिया' इमारतीत

- मुख्यमंत्र्यांची सूचना; सर्वसामान्यांना अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्या


मुंबई : राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांची कार्यपद्धती अधिक गतिमान, सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी नरिमन पॉईंट येथील 'एअर इंडिया' इमारतीचे (Air India Building) नूतनीकरण करताना नागरिकांच्या सोयीच्या विभागांना प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. विविध शासकीय विभागांपैकी कोणत्या विभागांचे स्थलांतर एअर इंडियाच्या इमारतीत करणे प्रशासकीय दृष्टीने आणि विशेषतः सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीचे ठरेल, याचा सविस्तर आढावा घेऊन मुख्य सचिवांनी अंतिम नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) दिल्या.


मुख्यमंत्र्यांच्या (Devendra Fadnavis) 'वर्षा' निवासस्थान सोमवारी आयोजित विशेष बैठकीत एअर इंडिया इमारतीच्या आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, विकास चंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार आणि मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके यांच्यासह संबंधित वास्तुविशारद उपस्थित होते.



या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) स्पष्ट केले की, नव्या प्रशासकीय रचनेत लोकाभिमुखतेला प्राधान्य दिले गेले पाहिजे. मंत्रालयात दैनंदिन कामासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. मुख्य सचिवांनी या संदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा करावी आणि त्यानंतरच विभागांच्या स्थलांतराबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात यावा, असेही त्यांनी नमूद केले.



जागेची टंचाई दूर होणार :


मंत्रालयातील जागेची टंचाई दूर करण्यासाठी आणि भाड्याच्या जागांवर होणारा अवाढव्य खर्च वाचवण्यासाठी राज्य सरकारने १ हजार ६०१ कोटी रुपये खर्चून केंद्र सरकारकडून ही २३ मजली इमारत खरेदी केली आहे. या इमारतीच्या डागडुजी आणि नूतनीकरणासाठी १८१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गेल्या दोन महिन्यांपासून हे काम वेगाने सुरू आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत इमारतीचे नूतनीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे.



कॅबिनेट बैठक २२ व्या मजल्यावर :


प्राधान्यक्रमाने २३ व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे (Devendra Fadnavis) भव्य कार्यालय आणि २२ व्या मजल्यावरील १३ हजार ३६३ चौरस फुटांच्या जागेत अत्याधुनिक 'कॅबिनेट हॉल' उभारला जात आहे. याशिवाय सध्या बाहेर भाड्याच्या इमारतींमध्ये चालवले जाणारे आरोग्य भवन, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता हे जनतेशी थेट निगडित असलेले महत्त्वाचे विभाग या इमारतीमध्ये एकत्र आणले जाणार आहेत. १५२ वाहनांची पार्किंग क्षमता आणि स्वतंत्र प्रवेशद्वारे असलेल्या या वास्तूमुळे नागरिकांना सर्व प्रशासकीय सेवा एकाच छताखाली मिळणे सुलभ होणार आहे. (Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून