Mohan Bhagwat : सरसंघचालक मुंबईत साधणार 'जेन-झीं'शी संवाद

मुंबई : देशातील तरुण पिढी सध्या लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सक्रियपणे विचारमंथन करत असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत येत्या ६ ऑगस्ट रोजी मुंबईत नव्या पिढीच्या प्रतिनिधींशी (जेन-झी) संवाद साधणार आहेत. 'इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स' (आयआयएमयूएन) या संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक चॅम्पियनशिप परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात सरसंघचालक उपस्थित राहून तरुणांना मार्गदर्शन करतील.



जगातील सर्वात मोठ्या युवा नेतृत्व संमेलनांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेत देशभरातील १०० हून अधिक शहरांमधील १५ ते १९ वयोगटातील दोन हजारांपेक्षा जास्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ऋषभ शाह यांनी २०११ मध्ये स्थापन केलेली 'आयआयएमयूएन' ही संस्था भारताची संस्कृती आणि विचारसरणी जागतिक पटलावर रुजवणारे एक प्रमुख व्यासपीठ म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे, गेल्या १५ वर्षांपासून १५ ते २४ वयोगटातील तरुणच या संस्थेचा संपूर्ण कारभार सांभाळत आहेत. या मंचावरून घडलेले अनेक तरुण आज लोकप्रतिनिधी, आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी, वकील, लेखक आणि यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत.



या संस्थेच्या सल्लागार मंडळात देशातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती अजय पिरामल, दीपक पारेख आणि नादिर गोदरेज यांच्यासह खासदार डॉ. शशी थरूर, माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आणि महान धावपटू पी. टी. उषा यांसारख्या नामवंत व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून