खासदार नारायण राणे यांचा विश्वास; वर्सोवा प्रवासी जेट्टी आणि ऑनलाइन तिकीट प्रणालीचा शुभारंभ
मुंबई : "मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचा कायापालट करण्याचे काम भाजप आणि महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. मुंबईचा प्रत्येक विभाग मी जवळून पाहिला असून येथील झोपडपट्ट्या आणि समस्यांची मला पूर्ण जाणीव आहे. आगामी काही वर्षांत मंत्री नितेश राणे आणि संबंधित खात्यामार्फत नरिमन पॉईंटप्रमाणे वर्सोव्यात सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील," असा विश्वास माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.
Cabinet Decision: शेतकरी कर्जमाफीचे निकष जाहीर
दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ; ‘वन टाईम सेटलमेंट’ आणि प्रोत्साहनपर अनुदान देणार मुंबई : राज्यातील शेतकरी बांधवांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी ...
तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार कोकणातील विकासाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, "मी जेव्हा सिंधुदुर्गात काम सुरू केले, तेव्हा तेथील 'पर कॅपिटा इन्कम' (दरडोई उत्पन्न) अवघे ३५ हजार रुपये होते, जे आज अडीच लाख रुपयांवर पोहोचले आहे. तिथली स्वच्छता आणि शिस्त संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नाही. तशीच शिस्त आता इथल्या मासेमारी व्यवसायातही आणली जाईल. उघड्यावर मासे टांगलेले दिसणार नाहीत, तर ते योग्य जागी साठवून विक्रीसाठी पाठवले जातील. किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आम्ही जशा बर्फ फॅक्टऱ्या आणि कोल्ड स्टोरेजची साखळी निर्माण केली, तशीच व्यवस्था इथेही उभारली जाईल." वर्सोवा भागात मत्स्य व्यवसायाशी संबंधित बाय-प्रॉडक्ट फॅक्टऱ्या आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट जेट्टी उभारून स्थानिक कोळी बांधव आणि तरुण पिढीसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी केली.खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणेंच्या हस्ते मुंबईतील वर्सोवा जेट्टीचे उद्घाटन@NiteshNRane @MeNarayanRane . . .#prahaarnewsline #marathinews #niteshrane #shiping #port #ianguration #nileshrane pic.twitter.com/QJZinsqa9i
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) June 2, 2026






