भारतीय चित्रपटसंगीत, भावसंगीत आणि भक्तीसंगीताच्या विश्वात गेल्या सात दशकांहून अधिक काळ आपल्या मधुर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली. त्यांच्या आवाजातील माधुर्य, गायलेल्या गीतांमधील भावविश्व आणि जपलेली संगीताची अभिजात परंपरा कायम स्मरणात राहणार आहे.
भारतीय संगीतविश्वात काही कलाकार असे असतात, ज्यांचे नाव घेताच त्यांच्या कलेचा गोडवा मनात दरवळू लागतो. सुमन कल्याणपूर हे त्यापैकीच एक नाव. त्यांनी कधीही स्वतःभोवती देदीप्यमान वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. त्या नेहमी संगीताची सेवा करत राहिल्या. परिणामी, त्यांच्या गायकीमध्ये प्रामाणिकपणा कायम राहिला. १९३७ मध्ये जन्मलेल्या सुमन हेमाडी या पुढे सुमन कल्याणपूर म्हणून संपूर्ण देशाला परिचित झाल्या. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना त्यांचा आवाज किती विलक्षण आहे, याची जाणीव संगीतविश्वाला झाली. मुंबईत त्यांचा संगीतप्रवास सुरू झाला आणि पुढे तो भारतीय चित्रपटसंगीताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय ठरला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे आगमन झाले, तेव्हा पार्श्वगायन क्षेत्रात अनेक दिग्गज कलाकार कार्यरत होते.
इस्रायलमध्ये सक्तीच्या लष्करी भरतीविरोधात सोमवारी हजारो अतिधार्मिक (अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स) ज्यू नागरिक रस्त्यावर उतरले. देशभर झालेल्या आंदोलनांमुळे ...
लता मंगेशकर यांचे वर्चस्व असलेल्या काळात स्वतःचे स्थान निर्माण करणे ही सोपी गोष्ट नव्हती. सुमनताईंच्या आणि लतादीदींच्या आवाजात असलेल्या काही प्रमाणातील साधर्म्यामुळे श्रोत्यांमध्ये अनेकदा संभ्रम निर्माण होत असे. रेडिओवर किंवा ध्वनिमुद्रिकांवर वाजणारी अनेक गाणी लोक लतादीदींची समजत; नंतर ती सुमनताईंनी गायली असल्याचे समजल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसत असे.
जळगाव - जमीन व्यवहारात मध्यस्थी केल्याचा दावा करून भारतीय सैन्य दलातील जवान व त्यांच्या वयोवृद्ध वडिलांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा तसेच ...
सुमनताईंची स्वतःची स्वतंत्र शैली होती. त्यांच्या गायकीत कोमलता होती; परंतु त्याच वेळी एक विशिष्ट भावगर्भता आणि शांत सौंदर्यही होते. त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अनेक दिग्गज संगीतकारांसोबत केलेले काम. एस. डी. बर्मन, नौशाद, मदन मोहन, रोशन, खय्याम, शंकर-जयकिशन यांसारख्या दिग्गजांनी त्यांच्या आवाजाची वैशिष्ट्ये ओळखली. त्यामुळे त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम गाण्यांचा भाग होण्याची संधी मिळाली. विशेष उल्लेख करावा लागेल तो मोहम्मद रफी यांच्यासोबतच्या युगुलगीतांचा. रफी आणि सुमन ही जोडी हिंदी चित्रपटसंगीतातील सर्वाधिक मधुर जोड्यांपैकी एक मानली जाते. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’, ‘तुमने पुकारा और हम चले आये’, ‘तुझे प्यार करते हैं, करते रहेंगे’, ‘परबतों के पेड़ों पर’, ‘ठहरिये होश में आ लूँ’ यांसारखी त्यांची गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. या गाण्यांमध्ये रफी यांच्या बहारदार आवाजाला सुमनताईंच्या कोमल स्वरांनी सुंदर साथ दिली होती.
- आचारसंहितेचा अडथळा दूर; 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजने'ला मंजुरीची शक्यता मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शेतकरी कर्जमाफी (Farmer Loan Waiver) योजनेला ...
सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी ‘ना तुम हमें जानो’ हे गाणे विशेष उल्लेखनीय आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय यश मिळवूनही सुमनताईंनी मराठी संगीतविश्वाशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. उलट, मराठी भावगीतांना एक अभिजात आणि सोज्वळ स्वर दिला. मराठी भावगीतांचा सुवर्णकाळ घडवणाऱ्या निवडक आवाजांमध्ये त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या आवाजात भावस्पर्शी कोमलता होती. त्यामुळे प्रेम, विरह, आठवण, प्रतीक्षा, भक्ती किंवा निसर्ग यांसारख्या विविध भावनांना त्यांनी अचूक अभिव्यक्ती दिली. केतकीच्या बनी तिथे’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘या झोपडीत माझ्या’, ‘मृदुल करांनी छेडित तारा’ यांसारखी गाणी आजही मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान राखून आहेत. भक्तीसंगीताच्या क्षेत्रातही त्यांची कामगिरी तितकीच उज्ज्वल आहे. महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांनी त्यांच्या आवाजातील भक्तीगीते ऐकतच आपले सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भान विकसित केले.
नवी दिल्ली : आज सुरुवातीच्या व्यवहारात देशांतर्गत शेअर बाजार (Share Market) नीचांकी पातळीवरून सावरत असल्याचे दिसून आले. व्यवहारांची सुरुवात कमजोर झाली. बाजार ...
नवी दिल्ली : आज सुरुवातीच्या व्यवहारात देशांतर्गत शेअर बाजार (Share Market) नीचांकी पातळीवरून सावरत असल्याचे दिसून आले. व्यवहारांची सुरुवात कमजोर झाली. बाजार ...
नवी दिल्ली : आज सुरुवातीच्या व्यवहारात देशांतर्गत शेअर बाजार (Share Market) नीचांकी पातळीवरून सावरत असल्याचे दिसून आले. व्यवहारांची सुरुवात कमजोर झाली. बाजार ...