पेट्रोल पंप चालकांनी साठेबाजी अथवा काळाबाजार केला तर...; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निर्वाणीचा इशारा

Nashik : नाशिक जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक, डीलर्स तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक संस्थांनी इंधन खरेदी-विक्री संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे. किरकोळ विक्री केंद्रांमधून व्यावसायिक, औद्योगिक अथवा संस्थात्मक ग्राहकांना अनधिकृतपणे इंधन पुरवठा करणे किंवा इंधन वळविणे सक्त मनाई आहे. असे प्रकार आढळल्यास संबंधित पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्यासह फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी दिला आहे.



मोठ्या व्यावसायिक, संस्थात्मक ग्राहकांना इंधन पुरवठा करणे नियमबाह्य


जिल्हाधिकारी प्रसाद (Ayush Prasad) म्हणाले की, किरकोळ ग्राहक आणि संस्थात्मक ग्राहक या दोन स्वतंत्र श्रेणी असून त्यांच्या इंधन खरेदीसाठी वेगवेगळ्या तरतुदी लागू आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) इंडियन ऑईल कॉर्पोरेशन विरुद्ध केरळ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (2018) 12 SCC 518 या प्रकरणातील निकालातही या दोन्ही ग्राहक वर्गांमधील भेद स्पष्ट केला आहे. त्यामुळे किरकोळ पेट्रोल पंपांद्वारे मोठ्या व्यावसायिक किंवा संस्थात्मक ग्राहकांना इंधन पुरवठा करणे नियमबाह्य ठरते.( Nashik News )



अनधिकृत व्यवहार, साठवणूकीवर लक्ष


केंद्र शासनाच्या द मोटार स्पिरिट अँड हाय स्पीड डिझेल (रेग्युलेशन ऑफ सप्लाय, डिस्ट्रिब्युशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ मॅल्प्रॅक्टिसेस) ऑर्डर, 2005 तसेच राज्य शासनाच्या संबंधित आदेशांनुसार इंधन पुरवठा व वितरणातील गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या (Petroleum products) पुरवठा साखळीत कोणत्याही प्रकारचा अनधिकृत व्यवहार, साठवणूक अथवा वळवण रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.



अनधिकृत इंधन पुरवठा केल्यास परवाना रद्द होणार


जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इतर संबंधित यंत्रणांमार्फत पेट्रोल पंप तसेच इंधन वाहतूक करणाऱ्या वाहनांची आकस्मिक तपासणी करण्यात येणार आहे. अनधिकृत इंधन वळवण अथवा पुरवठा केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित डीलरचा परवाना तत्काळ निलंबित अथवा रद्द करण्यात येईल. तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 आणि इतर लागू कायद्यांनुसार संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.


जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी नियमांचे पालन करून कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत व्यावसायिक इंधन पुरवठ्यापासून दूर राहावे आणि इंधन वितरण व्यवस्थेची पारदर्शकता व शिस्त कायम राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी