Farmer Loan Waiver : मंत्रिमंडळ बैठकीत आज शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार?

- आचारसंहितेचा अडथळा दूर; 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजने'ला मंजुरीची शक्यता


मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शेतकरी कर्जमाफी (Farmer Loan Waiver) योजनेला आचारसंहितेच्या अटींमधून विशेष सवलत दिल्यानंतर, आज (मंगळवार) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. (Cabinet Meeting)


महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार, मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मार्च २०२६ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' (Farmer Loan Waiver) जाहीर केली होती. त्याची अंमलबजावणी ३० जून २०२६ आधी केली जाणार होती. मात्र, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली आणि या योजनेच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेला हिरवा कंदील दाखवल्यामुळे प्रशासकीय पातळीवरील सर्व अडथळे दूर झाले आहेत. (Cabinet Meeting)



अर्थसंकल्पातील घोषणेनुसार, या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी (Farmer Loan Waiver) दिली जाणार आहे. तर दुसरीकडे, बँकेचे कर्ज नियमितपणे परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपयांचे विशेष अनुदानही दिले जाणार आहे. या दोन्ही घटकांना एकाच वेळी लाभ देण्याची तयारी सरकारने पूर्ण केली आहे. (Cabinet Meeting)



शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा मानस :


तात्पुरती कर्जमाफी (Farmer Loan Waiver) देऊन न थांबता, राज्यातील बँकिंग यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि शेतकऱ्यांना भविष्यात कायमस्वरूपी कर्जमुक्त करणे, हे सरकारचे मुख्य ध्येय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना स्पष्ट केले होते. यासाठी गठीत करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारसींनुसार पुढील धोरणात्मक कार्यवाही केली जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आणि निधी वितरणाचा अंतिम आकृतीबंध मंजूर होण्याची शक्यता असून, यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर राज्यातील बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. (Cabinet Meeting)

Comments
Add Comment

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात हवामान बदलले; रविवारी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागांत

Bhuleshwar Ganpati Incident : मुंबईत २२ फूट उंच गणेशमूर्ती कोसळली; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी

मुंबई : मुंबईच्या दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान मोठा अपघात झाला. तब्बल २२ फूट

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.