EPFO : युपीआयद्वारे पीएफ धारकांचे पैसे काही सेकंदांत खात्यात मिळणार

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या ८ कोटींहून अधिक सदस्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. ‘EPFO 3.0’ या नव्या सुधारीत प्रणालींतर्गत, आता पीएफ (PF) धारकांना त्यांच्या खात्यातील पात्र रक्कम थेट युपीआय (UPI) द्वारे काढता येणार आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविय यांनी नुकतीच या सुविधेच्या यशस्वी चाचणीची माहिती दिली असून, ही सेवा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुली होणार असल्याचे स्पष्ट केले.



सध्या पीएफचे पैसे काढण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. तसेच १ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास मॅन्युअल पडताळणी करावी लागते. कागदपत्रांमध्ये किरकोळ चूक आढळल्यास क्लेम नाकारला जातो किंवा रखडतो. मात्र, EPFO 3.0 मुळे ही संपूर्ण प्रक्रिया कागदविरहित होणार आहे. यात Employer मंजुरीची गरज नसल्यामुळे आठवड्यांचे काम अवघ्या काही सेकंदांत पूर्ण होणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरचे आर्थिक स्थैर्य जपण्यासाठी पीएफ खात्यातील २५ टक्के रक्कम नेहमी लॉक राहील. सदस्यांना त्यांच्या एकूण रकमेच्या ५० ते ७५ टक्क्यांपर्यंतचीच पात्र रक्कम युपीआय द्वारे काढता येईल. उमंग (UMANG) अॅपवर सदस्यांना ‘पात्र शिल्लक’ आणि ‘लॉक केलेली शिल्लक’ स्वतंत्रपणे पाहता येईल. आजारपण, शिक्षण, लग्न किंवा घरासाठी लागणारा निधी या सुविधेमुळे अवघ्या तीन दिवसांच्या आत किंवा अगदी तात्काळ बँक खात्यात जमा करता येईल.


या डिजिटल सुविधेचा लाभ घेण्यासाठी –
१. सदस्याचे युएएन (UAN – Universal Account Number) सक्रिय असणे गरजेचे आहे.
२. युएएन सोबत पॅन आणि आधार कार्ड लिंक आणि पडताळणी केलेले असावे.
३. पीएफ रेकॉर्ड आणि आधार कार्डवरील नाव तसेच जन्मतारीख यामध्ये कोणताही फरक नसावा, ती तंतोतंत मॅच होणे बंधनकारक आहे.
व्हॉट्सॲप चॅटबॉटचीही सुविधा
पीएफ धारकांसाठी आणखी सोपे करण्यासाठी ही प्रणाली व्हॉट्सॲप चॅटबॉटशी जोडली जात आहे. यामुळे सदस्यांना केवळ एक मेसेज पाठवून आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम आणि पैसे काढण्याची पात्रता सहज तपासता येणार आहे. EPFO च्या या ऐतिहासिक पाऊलामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा आणीबाणीच्या काळात अगदी एटीएम किंवा युपीआय पिन वापरून थेट बँक खात्यात मिळवणे शक्य होणार आहे.

Comments
Add Comment

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण