मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण प्रश्न असा आहे भारताची शिक्षणव्यवस्था AIसाठी किती तयार आहे आणि हा नवा उपक्रम काय बदल आणणार?
QS I-GAUGEच्या नव्या अहवालानुसार, भारतातील केवळ १३ टक्के शाळांनी AIचं प्रगत आणि प्रणालीव्यापी एकत्रीकरण साध्य केलं आहे. या सर्वेक्षणात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ७१ K-12 संस्थांमधील १,२०९ शिक्षकांचे, तर २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १४६ उच्च शिक्षण संस्थांतील १,११८ प्राध्यापकांची मतं घेण्यात आली. यामधून शाळांकडून AIबाबत सकारात्मक दृष्टिकोनही दिसतो. ८८ टक्के शिक्षकांच्या मते, त्यांच्या संस्थांचं भविष्यातील नेतृत्व करण्यासाठी AI महत्त्वाचं मानतं जातंय. तर ८६ टक्के शिक्षकांनी त्यांच्या शाळा AIसंदर्भात संरचित प्रशिक्षण देण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं.
मुंबई : भाजपच्या पक्षसंघटनेची सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली समिती असणाऱ्या संसदीय मंडळात लवकरच काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. या बदलांमध्ये ...
पण AIच्या वापरासाठी स्पष्ट नियमांची गरजही शिक्षकांनी व्यक्त केली आहे. तब्बल ९१ टक्के शिक्षकांना विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामात AIचा किती आणि कसा वापर करावा, यासाठी निश्चित मापदंड हवे आहेत. दुसरीकडे पालकांच्या दृष्टीने विचार केला तर, डेटा प्रायव्हसी आणि बौद्धिक अवलंबित्व प्रत्येकी ७७ टक्के, तर वाढता स्क्रीन टाइम ही ७६ टक्के पालकांची चिंता असल्याचं समोर आलं. उच्च शिक्षणातही AIकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ८३ टक्के प्राध्यापकांना AIमुळे प्रशासकीय काम अधिक कार्यक्षम होण्याची, तर ७६ टक्के प्राध्यापकांना शैक्षणिक कामगिरी सुधारण्याची अपेक्षा आहे. मात्र ७८ टक्के प्राध्यापकांना AIवरील अतिअवलंबित्वामुळे विद्यार्थ्यांची स्वतंत्र विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता कमी होण्याची चिंता आहे.
म्हणून एकंदरच, AIचा प्रश्न फक्त ‘किती वापरायचं?’ हा नाही तर ‘जबाबदारीने कसं वापरायचं ?’ हा आहे. QS I-GAUGEच्या मते, भारताचं ध्येय केवळ AI स्वीकारणं नसून नाविन्य, शैक्षणिक सचोटी आणि मानवी विवेकबुद्धी यांचा समतोल साधणारी जबाबदार AI क्षमता निर्माण करणं असायला हवं व भारताकडून त्याच दिशेने घडलेली प्रगती येणाऱ्या काळात नक्कीच पाहायला मिळेल.