Monday, June 1, 2026

कोकण विकासाच्या वाटेवरील अडथळे

कोकण विकासाच्या वाटेवरील अडथळे

कोकणातील विकास, पर्यटन आणि राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर अफवा, बुद्धिभेद आणि पक्षीय भूमिकांमुळे निर्माण होणारे गोंधळ यामुळे प्रत्यक्ष विकास प्रक्रियेला अडथळा येतो, असे चित्र दिसते. प्रकल्पांवरील विकासकल्पनांवरही पुरेशी मोकळी चर्चा होत नाही. मात्र कोकणातील पर्यटन हा भविष्यातील आर्थिक विकासाचा महत्त्वाचा आधार ठरू शकतो. गोव्याच्या तुलनेत देश-विदेशातील पर्यटकांचा ओढा येथे वाढत आहे. त्यामुळे विकासाबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे ही आजची गरज आहे.

अफवा आणि बुद्धिभेद यांचा प्रभाव जनमानसावर इतका खोलवर केला जातो की त्यातून बाहेर पडून चांगले–वाईट याचा विवेकी विचार करणेही अनेकांना कठीण होऊन बसते. यासाठी विविध राजकीय पक्षांतील काही नेते जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसते. याचा परिणाम असा होतो की कोकण विकासाच्या मुद्द्यावर अपेक्षित प्रगती होत नाही,ही वस्तुस्थिती आ

">हे. एखाद्या प्रकल्पाबाबत जर कोणी सकारात्मक भूमिका मांडली, तर त्या व्यक्तीला लगेचच सत्ताधाऱ्यांचा समर्थक ठरवले जाते. दुसरीकडे, कोणत्याही प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांपैकी किती जण प्रत्यक्षात नवीन आणि पर्यायी विकासकल्पनांसाठी सक्रियपणे काम करतात, हा प्रश्न उपस्थित होतो. बहुतांश वेळा अशा प्रयत्नांचा अभावच दिसतो. कोकणात विनाशकारी प्रकल्प येऊ नयेत, याबाबत कोणाचाही विरोध नाही.

मात्र कोणताही प्रकल्प येण्यापूर्वीच चर्चेचे दरवाजे बंद करणे आणि नंतर “कोकणात काहीच होत नाही” अशी भूमिका घेणे ही राजकीय दुटप्पीपणा ठरतो. या दृष्टिकोनात बदल होणे आवश्यक आहे. विचारपूर्वक चर्चा, पारदर्शकता आणि विकासाच्या पर्यायांवर खुला संवाद याची गरज आहे. आजच्या घडीला जगभरात पर्यटन व्यवसाय अतिशय वेगाने वाढत आहे. त्यामुळे पर्यटनातून आर्थिक समृद्धीची स्वप्ने साकार होऊ शकतात, हे स्पष्ट दिसते. कोकणाला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिले आहे. म्हणूनच कोकणचे ‘कोकणपण’ जपणे आणि पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असलेली सकारात्मक मानसिकता निर्माण करणे गरजेचे आहे. कोकणाला लागून असलेल्या गोवा राज्यात देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात.

मात्र गेल्या काही वर्षांत गोव्यात पर्यटकांना मिळणारी वागणूक, तसेच काही ठिकाणी होणारी लूटमार याबाबत पर्यटकांमध्ये नाराजी दिसते. याच्या तुलनेत कोकणातील किनारपट्टी अधिक शांत, मोकळी आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आहे. कोकणातील समुद्रकिनारे गोव्यापेक्षाही अधिक स्वच्छ आणि सुंदर असल्याचे अनेक पर्यटकांचे मत आहे. त्यामुळे देशभरातील

"> तसेच परदेशी पर्यटकांचा ओढा कोकणाकडे वाढू लागला आहे. कोकणातील पर्यटन व्यवसायातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळू शकतो, ही बाब आजपर्यंत पुरेशा गांभीर्याने विचारात घेतली गेली नाही. पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित महाराष्ट्राने कोकणाला अनेकदा दुर्लक्षित केले आहे, असेही दिसते. १९९७ साली कोकणातील पर्यटन विकासाचा विचार प्रथम करण्यात आला. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याला देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून कोकणातील निसर्गसौंदर्य आणि पर्यटन क्षमतेची अधिक जाणीव होऊ लागली आहे. निसर्गाने कोकणाला जे वैभव दिले आहे, त्याची खरी जाणीव कोकणालाच पुरेशी झाली नाही असे म्हणावे लागते.

पर्यटन व्यवसाय हा कोकणाच्या विकासासाठी एक मोठे वरदान ठरू शकतो आणि याच क्षेत्रातून आर्थिक सक्षमतेचा मार्ग खुला होऊ शकतो, ही कल्पना दीर्घकाळ स्पष्टपणे मांडली गेली नाही. ‘कोकणचा कॅलिफोर्निया’ हे स्वप्न अनेक वर्षे चर्चेत राहिले. या दिशेने पहिल्यांदा ठोस विचारांना चालना देण्याचे काम १९९७ साली तत्कालीन खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून झाले. त्यानंतर कोकणातील पर्यटनाबाबत अधिक चर्चा सुरू झाली. त्यापूर्वीच रायगड जिल्ह्यात काही प्रमाणात औद्योगिकीकरण सुरू झाले होते आणि उद्योगांनी आपले पाय रोवले होते. याचबरोबर रायगडच्या किनारपट्टीवर पर्यटन व्यवसायही हळूहळू वाढत गेला. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांवर वर्षभर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ लागले आणि पर्यटनाला वेगळी गती मिळाली.

रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत औद्योगिकीकरण झाले आणि उद्योग उभे राहिले, मात्र त्याचा अपेक्षित मोठा फायदा स्थानिक तरुणांना झाला असे म्हणता येत नाही. उत्तर रत्नागिरीत काही उद्योग स्थापन झाले, परंतु मर्यादित स्वरूपातच औद्योगिक विकास झाला आणि त्याचा विस्तार ठराविक मर्यादेपलीकडे जाऊ शकला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थितीही काहीशी अशीच आहे. तेथे पर्यटन जिल्हा म्हणून विकास करण्याची संकल्पना मांडली गेली, परंतु प्रत्यक्षात त्या दिशेने अपेक्षित वेगाने प्रगती होऊ शकली नाही.

रत्नागिरीमध्ये फलोद्यान आणि प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून विकास साधण्याचा तसेच रायगड जिल्ह्याचा औद्योगिकीकरणातून विकास करण्याचा विचार खासदार नारायण राणे यांनी राज्यात मंत्री असताना मांडला होता. त्या दिशेने काही प्रयत्नही झाले. मात्र कोकणाचा चेहरा बदलू शकणाऱ्या ‘सी वर्ल्ड’सारख्या प्रकल्पालाही राजकीय विरोधाचा सामना करावा लागला. आजही कोकणात येणाऱ्या अनेक विकास प्रकल्पांना केवळ राजकारणातून विरोध होताना दिसतो. काही वेळा अफवा आणि गैरसमज पसरवून जनमानसात संभ्रम निर्माण केला जातो, ज्यामुळे चांगल्या-वाईटाचा विचार करण्याची मोकळीक कमी होते. विविध राजकीय पक्षांतील काही नेत्यांकडून अशा प्रकारे सातत्याने प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जातो. परिणामी कोकणाचा विकास अपेक्षित गतीने होताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या प्रकल्पाबाबत सकारात्मक मांडणी केली तर ती मांडणारी व्यक्ती लगेचच सत्ताधाऱ्यांची समर्थक ठरवली जाते.

दुसरीकडे, जे प्रकल्पांना विरोध करतात त्यापैकी किती जण स्वतःहून नवीन विकास प्रकल्प पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतात, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. अनेकदा केवळ विरोधासाठी विरोध अशी भूमिकाच दिसून येते. विकासाविषयीची चर्चा सुरू होण्यापूर्वीच ती दडपली जाते आणि मग “कोकणात काही होत नाही” अशी टीका केली जाते. ही भूमिका दुटप्पी ठरते. पर्यटन विकासाच्या क्षेत्रात कोकणने अलीकडच्या काळात काही प्रमाणात प्रगती केली आहे, हेही मान्य करावे लागते. मात्र ही प्रगती अधिक व्यापक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने वाढवण्याची गरज आहे.कोकणातील निवती रॉक येथे ‘गुलदार’ युद्धनौका समुद्रात स्थिर करण्यात यश आले. भारतातील हा पहिलाच प्रयोग. पर्यटन विकास महामंडळ आणि राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणच्या पर्यटन क्षेत्रात हे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जगात अमेरिकेतील फ्लोरिडा आणि ऑस्ट्रेलियातील एमएमएएस स्पॅन यांसारखे समुद्रतळाशी कृत्रिम रीफ तयार करणारे प्रकल्प यापूर्वी राबविण्यात आले आहेत. आपण नकारात्मकतेऐवजी सकारात्मक दृष्टिकोनातून याकडे पाहिले, तर निश्चितच कोकणातील पर्यटन वाढेल आणि त्याचबरोबर कोकणाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा एक नवा मार्गही यातून निर्माण होईल.

___ संतोष वायंगणकर
Comments
Add Comment