Monday, June 1, 2026

Drugs Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'साठी उच्चस्तरीय समिती

Drugs Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'साठी उच्चस्तरीय समिती
१२ कलमी विशेष कार्यक्रम राबविण्याची राज्य सरकारची घोषणा; २१ जूनपासून मोहिमेला सुरुवात मुंबई : गोरेगाव येथील नेस्को संकुलात आयोजित एका संगीत कार्यक्रमादरम्यान (कॉन्सर्ट) अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे (ड्रग्ज) झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्य सरकारने मुंबईला ड्रग्जमुक्त करण्यासाठी विशेष उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून मुंबईत वर्षभर '१२ कलमी विशेष कार्यक्रम' राबविला जाणार असून, येत्या २१ जूनपासून या मोहिमेची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
गोरेगाव येथील दुर्दैवी घटनेनंतर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या गंभीर प्रकरणाची तातडीने
"> दखल घेण्याची आणि कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. लोढा यांच्या या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावाला तातडीने मंजुरी देत या उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. या समितीची पहिली महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली असून, त्यामध्ये मुंबईभर वर्षभर राबवल्या जाणाऱ्या १२ कलमी उपक्रमांच्या आराखड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
'१२ कलमी' कृती आराखडा जून २०२६ ते जून २०२७ या कालावधीत मुंबईत ड्रग्जविरोधात जनचळवळ उभारण्यासाठी दरमहा विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यानुसार, २१ जूनपासून अभियानाची सुरुवात घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धेने होईल. जुलैमध्ये सोशल मीडियावर रील स्पर्धा, तर ऑगस्टमध्ये शाळा-महाविद्यालयांमध्ये नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली जाईल. सप्टेंबरमध्ये पथनाट्ये (स्ट्रीट प्ले) आणि ऑक्टोबरमध्ये गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरव्यापी भव्य रॅलीचे आयोजन केले जाईल. नोव्हेंबरमध्ये ‘ड्रग-फ्री मुंबई फेस्ट’ आणि डिसेंबरमध्ये तरुणाईशी थेट ‘युवा संवाद’ साधला जाईल. जानेवारीत ‘नो ड्रग्स झोन’ मोहीम, फेब्रुवारीत निबंध स्पर्धा, मार्चमध्ये फिटनेस मॅरेथॉन, एप्रिलमध्ये ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर पडलेल्यांची यशोगाथा मांडणी आणि मे महिन्यात उत्कृष्ट वॉर्ड व कॅम्पस पुरस्कार दिले जातील.
लोकसहभागातून जनचळवळ उभारणार - लोढा या मोहिमेसाठी ‘नशामुक्त मुंबई, सुरक्षित भविष्य’, ‘आपली मुंबई, नशामुक्त मुंबई’ आणि ‘मुंबई अगेन्स्ट ड्रग्ज’ अशी घोषवाक्ये निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र, धार्मिक संस्था आणि सेलिब्रिटींना सह
">भागी करून घेतले जाईल. "ड्रग्जविरोधातील हा लढा केवळ पोलीस कारवाईने जिंकता येणार नाही, तर त्यासाठी लोकसहभागातून जनचळवळ उभी करणे आवश्यक आहे," असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. प्रत्येक पोलीस परिमंडळात स्वतंत्र समन्वय समिती या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि स्थानिक पातळीवर योग्य समन्वयासाठी मुंबईतील प्रत्येक पोलीस परिमंडळात (झोन) एक स्वतंत्र समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समित्यांमध्ये स्थानिक पालिका वॉर्ड अधिकारी, शिक्षण अधिकारी, सामाजिक न्याय व महिला-बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी, समुपदेशक, स्वयंसेवी संस्था (एनजीओ), पत्रकार प्रतिनिधी आणि स्थानिक पोलीस निरीक्षकांचा समावेश असेल. या सर्वसमावेशक समित्यांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत ड्रग्जविरोधी मोहीम पोहोचवून मुंबईतील तरुण पिढीला सुरक्षित करण्याचा सरकारचा मानस आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >