Friday, July 31, 2026

Bhiwandi building collapsed : भिवंडी इमारत दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना आणि जखमींना मदत जाहीर

Bhiwandi building collapsed : भिवंडी इमारत दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना आणि जखमींना मदत जाहीर

भिवंडी : ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडीत (Bhiwandi) भंडारी कंपाऊंड परिसरातील गंगाराम वाडी येथे कोहिनूर (Kohinoor) इमारत कोसळली (building collapsed). या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता दहा वर पोहोचला आहे. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफच्या टीम मदतकार्य करत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना घटनास्थळी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (A four-storey residential building collapsed in Bhiwandi, Thane district near Mumbai)

इमारत धोकादायक स्थितीत होती. शिवाय कोहिनूर इमारतीच्या ए विंगमध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते. यामुळे काही रहिवाशांनी तात्पुरते वास्तव्याचे ठिकाण बदलले होते. पण काही रहिवासी इमारतीतच वास्तव्यास होते. तसेच काही कामगार पण इमारतीत होते. दुर्घटना झाली त्यावेळी हे सर्व जण ढिगाऱ्याखाली दबले. यामुळेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली.

काही मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. ज्या मृतदेहांची ओळख पटली आहे त्यांची नावं प्रशासनाने जाहीर केली आहेत.

१) शमीम शेख वय ३२ २) रंजीत सिंग वय ४५ ३) मिराज रसूल शेख वय ३४ ४) संतोष कुमार पांडे वय ४२ ( नातेवाईक - अंकित पांडे 9511795611) ५) शमीम अन्सारी वय ३० ( नातेवाईक -शाहिद अन्सारी 9175169964) ६) राकेश पासवान वय अंदाजे २५ ते ३० ७) मुकेश पासवान वय अंदाजे ३० ते ३५ ८) अशोक पासवान वय अंदाजे ४० ते ५० ९) पुरुष, ओळख पटलेली नाही १०) ओळख पटलेली नाही

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

अतिधोकादायक इमारतींमधून नागरिकांना बाहेर काढण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

महापालिकेची नोटीस असतानाही दुरुस्तीचे काम सुरू ठेवणाऱ्या कंत्राटदारावर तत्काळ फौजदारी कारवाई करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. त्यांनी दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केले. कोहिनूर इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मृतांना श्रद्धांजली वाहिली.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >