नागपूर: महाराष्ट्राच्या नागपूर शहरातून एक अतिशय मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये १७ वर्षीय होतकरू महिला क्रिकेटपटूने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. अदिती चौखंडे असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, क्रिकेट संघात निवड न झाल्यामुळे आलेल्या नैराश्येतून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट देखील हस्तगत झाली आहे.
पुणे स्टेशन ते मुळशी विशेष बससेवा सुरू; शिवालय मंदिर, जेटी बोटिंग, मुळशी धरण आणि पळसे धबधबा एका ट्रिपमध्ये पुणे : पावसाळ्यात मुळशी (Mulshi) आणि ताम्हिणी घाट ...
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदिती चौखंडे ही मूळची महाराष्ट्रातील अकोला येथील रहिवासी होती. गेल्या दोन वर्षांपासून ती नागपूरमधील लक्ष्मीनगर परिसरातील ‘उमालक्ष्मी अपार्टमेंट्स’मध्ये आपल्या आई आणि भावासोबत राहत होती. तिचे वडील अकोला येथे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत आहेत. अदितीने १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते आणि ती आपल्या भावासोबत नागपूरमधील एका क्रिकेट अकादमीत नियमितपणे क्रिकेटचे धडे गिरवत होती.
बुधवारी रात्री तिने आपल्या कुटुंबासोबत जेवण केले, त्यानंतर ती आपल्या खोलीत गेली. यादरम्यान तिचा भाऊ बाहेर गेला होता. काही वेळाने हा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच बजाज नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) अनुषंगाने सुरू असलेल्या विविध विकासकामांदरम्यान पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी ...
सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे?
घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये अदितीने आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. तिने चिठ्ठीत लिहिले आहे की, “दादा, तू खूप चांगला खेळतो आहेस, तू नक्कीच खूप पुढे जाशील. आपल्या आई-बाबांना अभिमान वाटेल अशी कामगिरी कर. मात्र, माझी संघात निवड न झाल्याने मी अत्यंत दुःखी आहे.”
अलीकडेच विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) निवड प्रक्रियेत तिचा समावेश न झाल्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून मोठ्या मानसिक तणावाखाली होती, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
Earthquake in Nashik : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यात मागील आठवड्यापासून सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. काही धक्के दिंडोरीसोबतच पेठ, कळवण आणि ...
पोलीस तपास सुरू
बजाज नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन चौहान यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात संघात निवड न झाल्यामुळे आलेल्या नैराश्येतून हा प्रकार घडल्याचे दिसत आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके आणि सविस्तर कारण शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येईल. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने कसून तपास करत असून, या दुर्दैवी घटनेमुळे क्रीडा वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.






