सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्विक - चिराग उपांत्यपूर्व फेरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या आघाडीच्या खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू, पुरुष एकेरीत लक्ष्य सेन, पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी आणि मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला-तनिषा क्रास्टो या भारतीय जोड्यांनी विजय संपादन करत स्पर्धेतील आव्हान कायम राखले.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२६ महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सामनाधिकारी पथकाची घोषणा केली असून सलग तिसऱ्यांदा ...
अनुभवी सिंधूने जपानच्या रिको गुनजीवर सरळ दोन डावांत मात करत शानदार विजय नोंदविला. अवघ्या ३७ मिनिटांत झालेल्या या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीही संधी दिली नाही. आता उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर अव्वल मानांकित आन से-यंगचे आव्हान असणार आहे.
स्टाव्हेंगर (वृत्तसंस्था): भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने जगातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनचा पराभव करत नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या ...
पुरुष एकेरीत लक्ष्य सेनला थायलंडच्या कुनलावुत वितिदसर्नविरुद्ध अनपेक्षितरीत्या पुढील फेरीत प्रवेश मिळाला. सामन्याच्या सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी दुखापतीमुळे माघार घेतल्याने लक्ष्यची आगेकूच निश्चित झाली. पुढील फेरीत त्याची लढत जपानच्या कोकी वतानाबेविरुद्ध होणार आहे.
पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिराग यांनी चिनी तैपेईच्या ली जे-हुई आणि यांग पो-ह्सुआन यांच्यावर २१-१५, ११-२१, २१-१८ अशा फरकाने रोमांचक विजय मिळविला. पहिला डाव सहज जिंकल्यानंतर भारतीय जोडी दुसऱ्या डावात पिछाडीवर पडली; मात्र निर्णायक डावात संयम राखत त्यांनी सामना आपल्या बाजूने फिरविला. आता त्यांच्यासमोर मलेशियाच्या कांग खाय झिंग आणि आरोन ताय यांचे आव्हान असेल.
बलाढ्य गुजरातसमोर राजस्थानचे 'वैभव'शाली आव्हान सुशील परब मुंबई : आयपीएल २०२६ चा थरार आता अंतिम आणि सर्वात रंजक टप्प्यात पोहोचला असून अंतिम फेरीत ...
मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनी जपानच्या युता
बलाढ्य गुजरातसमोर राजस्थानचे 'वैभव'शाली आव्हान सुशील परब मुंबई : आयपीएल २०२६ चा थरार आता अंतिम आणि सर्वात रंजक टप्प्यात पोहोचला असून अंतिम फेरीत ...






