भारतीय नेमबाज ईशा सिंहने ISSF World Cup Munich 2026 स्पर्धेत इतिहास रचला आहे. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. विशेष म्हणजे, ईशाने तब्बल 43 गुणांची कमाई करत जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.मुंबईतील राजकीय वर्तुळातूनही तिच्या कामगिरीचं जोरदार कौतूक होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ईशाचं अभिनंदन केलं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, Golden aim with a world record! भारतीय नेमबाज ईशा सिंहला मनःपूर्वक शुभेच्छा. तुझ्या अचूक नेमबाजीने आणि शानदार कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला आहे.
Golden aim with a world record! 🥇🇮🇳 Heartiest congratulations to Indian shooter Esha Singh for clinching the gold medal and creating a world record in the Women’s 25m Pistol event at the ISSF World Cup Munich 2026! Your precision and remarkable performance have made the nation… pic.twitter.com/aln9YdV3PP
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 28, 2026
स्पर्धेनंतर बोलताना ईशा सिंहने सांगितलं की,म्युनिक माझ्यासाठी खूप खास होतं. येथे स्पर्धा अत्यंत कठीण असते. फायनलमध्ये माझ्या हाताला थरथर होत होती, पण मी स्वतःवर आणि सरावावर लक्ष केंद्रित केला होता. तिच्या या शांत आणि आत्मविश्वासपूर्ण खेळीने तिने कोरियाच्या किम येजीचा 42 गुणांचा जुना विक्रम मोडला आहे . फायनलमध्ये ईशाने सुरुवातीपासून आक्रमक प्रदर्शन करत सलग परफेक्ट फाइव्हस मारल्या. त्यामुळे जर्मनीची डोरीन वेनेकॅम्प हिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं, तर बल्गेरियाच्या मिरोस्लावा मिन्चेवा हिने कांस्यपदक पटकावलं.






