Friday, May 29, 2026

Pune Crime : जनगणना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; १० जणांविरोधात गुन्हा दाखल,पुण्यात खळबळ

Pune Crime : जनगणना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; १० जणांविरोधात गुन्हा दाखल,पुण्यात खळबळ

पुणे: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जनगणनेचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला ५ ते १० जणांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. ही घटना पुण्यातील महर्षीनगर परिसरातील मीनाताई ठाकरे वसाहतीत घडली असून याप्रकरणी स्वर्गते पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या पुणे महानगरपालिकेत कार्यरत आहेत. जनगणनेच्या कामासाठी ते त्या परिसरात गेल्या होत्या. २७ मे रोजी दुपारी तीन ते साडेचारच्या दरम्यान त्या घराघरांत माहिती गोळा करत होत्या. त्यवेळी आरोपींनी त्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्या.

आधी शिवीगाळ नंतर दगडीने मारहाण

तक्रारीनुसार, विकास मोरे, क्रांती मोरे, मुक्ता कसबे, अभिजीत मोरे यांच्यासह इतरांनी महिला कर्मचाऱ्याशी पहिला वाद घालत शिवीगाळ केली. दुसऱ्या दिवशी संबंधित कुटुंबाची समजूत काढण्यासाठी महिला कर्मचारी पुन्हा त्या भागात गेल्या होत्या. तेव्हा आरोपींनी त्यांच्या पाठीमागून येत दगडाने हल्ला केला आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी विकास मोरे, क्रांती मोरे, मुक्ता कसबे, लीलावती मोरे, अभिजीत मोरे आणि इतर अनोळखी महिला-पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

जनगणना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशेवर प्रश्न चिन्ह

दरम्यान, राज्यात जनगणना कामादरम्यान कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या ताणतणाव आणि दुर्घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी कोल्हापूर, सांगोला आणि लातूर येथे जनगणनेचे काम करताना तीन शिक्षकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे जनगणना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात यावे अश्या मागण्या होत आहेत. तसेच कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि नोकरी द्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >