Friday, August 21, 2026

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली आहे. श्रावण महिन्यात अपेक्षित असलेल्या श्रावणसरी गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच हवामान विभागाच्या नव्या अंदाजामुळे पावसाची प्रतीक्षा आणखी लांबण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Alert)

कोकणातही पावसाचा जोर ओसरला :

कोकण विभागात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असली, तरी बहुतांश भागांत उष्ण, दमट आणि कोरडे हवामान जाणवत आहे. पुढील काही दिवसांतही मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. (Maharashtra Weather Alert)

उत्तर महाराष्ट्रातही पावसाची उघडीप :

धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतली आहे. काही भागांत हलक्या सरी पडत असल्या तरी दमदार पावसाचा अभाव आहे. त्यामुळे काही ठिकाणी पावसाची तूट निर्माण होण्याची परिस्थिती आहे. पुढील काही दिवस हवामान बहुतांश कोरडे राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Alert)

पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा चटका :

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही पावसाचा जोर कमी झाला आहे. बहुतांश भागांत कोरडे आणि दमट हवामान असून काही ठिकाणी उन्हाची तीव्रताही जाणवत आहे. घाटमाथा परिसरातही पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. (Maharashtra Weather Alert)

मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली :

मराठवाड्यात पावसाची तूट अधिक जाणवत आहे. मागील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पिकांच्या वाढीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम असून बहुतांश भागांत उष्ण आणि दमट वातावरण आहे. (Maharashtra Weather Alert)

विदर्भातही पावसाचा जोर कमी :

अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांतही पावसाने उघडीप घेतली आहे. अनेक भागांत पावसाची तूट जाणवत असून सध्या उष्ण आणि दमट हवामानाचा अनुभव येत आहे. (Maharashtra Weather Alert)

पुढील काळात काय परिस्थिती?

सध्या राज्यात जोरदार पावसासाठी पोषक अशी ठोस हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत कोरडे, दमट आणि काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता चांगल्या पावसाकडे लागले आहे. (Maharashtra Weather Alert)

दरम्यान, पुढील काही आठवड्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने राज्यातील पावसाची स्थिती आणि हवामान विभागाचे आगामी अपडेट महत्त्वाचे ठरणार आहेत. (Maharashtra Weather Alert)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >