Friday, August 21, 2026

Tragedy in Chhatrapati Sambhajinagar : मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील दुर्घटनेने हळहळ

Tragedy in Chhatrapati Sambhajinagar : मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील दुर्घटनेने हळहळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. मोबाईल फोनवर पालकांशी झालेल्या वादान्यानंतर आत्महत्येच्या उद्देशाने डोंगरावर गेलेल्या १९ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात अखेर आई-वडिलांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांच्या एकाच वेळी मृत्यूमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज एमआयडीसी अंतर्गत येणाऱ्या तिसगाव परिसरात ही दुर्घटना घडली. कुणाल चांदगुडे (१९, रा. झाल्टा फाटा) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी मोबाईल फोनवरून पालकांशी झालेल्या वादान्यानंतर कुणाल संतापून आत्महत्येच्या इराद्याने एका डोंगरावर जाऊन पोहोचला होता.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

या घटनेची माहिती मिळताच त्याचे आई-वडील मुरलीधर चांदगुडे (४८) आणि संगिता चांदगुडे तात्काळ घटनास्थळी धावले. दरम्यान, स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी कुणालला समजवण्याचे आणि खाली जाळी टाकून वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तरुण सतत आपली जागा बदलत असल्यामुळे बचावकार्य अवघड ठरले. या दरम्यान, त्याचे वडील कुणालला समजावून सांगत असतानाच त्याने अचानक डोंगरावरून खाली उडी मारली. मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनीही त्याच्यामागे धाव घेतली आणि तेही खाली कोसळले. या धक्कादायक प्रकारामुळे घाबरलेल्या आणि हतबल झालेल्या आईनेही क्षणाचाही विचार न करता डोंगरावरून खाली उडी मारली. या भीषण दुर्घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि उत्तरमृत्यूपरीक्षणासाठी (post-mortem) पाठवले आहेत. एका क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाने संपूर्ण कुटुंब संपवल्यामुळे या संपूर्ण घटनेवर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >