- बचाव कार्यासाठी एसडीआरएफ पथक तैनात; जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
लखनऊ : उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात बेतवा नदीवर बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलाचा स्लॅब आणि शटरिंग शुक्रवारी पहाटे जोरदार वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून सहा मजुरांचा मृत्यू झाला असून, आणखी काही जण मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. (Betwa River Bridge Collapses)
मुंबई : देशासह राज्यात सध्या उष्णतेने अक्षरशः कहर केला असून अनेक शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक ...
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि सेतू निगमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बचाव कार्यासाठी एसडीआरएफला तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत मलब्यातून चिल्ला बांदा येथील लोकेन्द्र (२४) पुत्र राधेश्याम निषाद, कुलदीप (२१) पुत्र प्रेमचंद्र निषाद, भूरागढ बांदा येथील सावंत (३०), स्वासा ललपुरा हमीरपूर येथील सभाजीत (३०), पुष्पेन्द्र सिंह (३५) आणि अछपुरा ललपुरा येथील राजेश पाल (४१) यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. (Betwa River Bridge Collapses)
मजुरांनी राजेश, कल्लू आणि अवधेश यांच्यासह इतर काही मजूरही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली आहे. बचाव पथकाने पुलाच्या खांबात अडकलेल्या तीन मजुरांना सुरक्षित बाहेर काढले आहे. (Betwa River Bridge Collapses)
ललपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश सरोज यांनी सांगितले की, दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सापडलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. (Betwa River Bridge Collapses)
मुंबई : मे महिना संपत आला असून सोमवारपासून जून महिन्याला सुरुवात होत आहे. अशा परिस्थितीत बँकेतील महत्त्वाची कामे करण्याचे नियोजन करत असाल, तर जून ...
२६ गावांतील दीड लाख ग्रामस्थांना मोठा दिलासा :
राज्यसभा खासदार बाबूराम निषाद यांनी सांगितले की, बेतवा नदीवर नवा पूल उभारल्यामुळे परसनी गावासह मौराकांदर, बहरौली डांडा, कलौलीजार, उजनेडी, अछपुरा वहदीना, स्वासा बुजुर्ग, स्वासा खुर्द, कुम्हऊपुर, कुआं डेरा, कंडौर, बैजेमऊ इस्लामपुर, हरेहटा, पतारा, जखेला, नैठी, रिठारी, छानी खुर्द, छानी बुजुर्ग, देवीगंज आदी २६ गावे वेगाने विकसित होतील. त्यांनी सांगितले की, हे ग्रामीण भाग अद्याप विकासाच्या बाबतीत खूप मागासलेले आहेत. शासनाने पुलाच्या बांधकामाला हिरवा कंदील दिला होता.






