Thursday, May 28, 2026

Crime : कॅनडातील भारतीय विद्यार्थिनीची क्रूर पणे केली हत्या... ती भारतीय होती म्हणून केली हत्या ? सत्य आलं समोर

Crime : कॅनडातील भारतीय विद्यार्थिनीची क्रूर पणे केली हत्या... ती भारतीय होती म्हणून केली हत्या ? सत्य आलं समोर

पोलिसांनी काय म्हटलंय?कॅनडामध्ये एका भारतीय विद्यार्थिनीची हत्या झाली आहे. २२ वर्षाची विद्यार्थिनी ती मूळची गुजरातमधल्या आणंदमधल्या बोरसदची होती. विद्यार्थिनी कॅनडातल्या नियाग्रा भागात राहात होती.कॅनडातील एक मोठ्या कॉलेज मध्ये ती शिकत होती सोबतच ती एक कंपनी मध्ये देखील काम करत होती . अशी माहीत पोलिसांकडून मिळाली

समोर आलेल्या माहितीनुसार कॅनडामध्ये विद्यार्थिनी चाकूचे वार करुन हत्या करण्यात आली. तीची हत्या का करण्यात आली? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.. १५ मे रोजी विद्यार्थिनी तिच्या घरातून बाहेर पडली. त्यावेळी तिच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तिला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.या प्रकरणी कॅनडा पोलीस आता तिच्या हत्येचा तपास करत आहेत.पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. कॅनडातील पोलीस आता या आरोपीची चौकशी करत आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.करणी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला आहे.कॅनडात सातत्याने भारतीय विद्यार्थ्यांवर हल्लेहोत आहेत. कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर हल्ले होणं त्यांची हत्या होणं हे प्रकार सुरुच आहेत हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात ३० वर्षीय हिमांशी खुरानाची हत्या करण्यात आली. एप्रिल २०२५ मध्ये ओंटियारोमध्ये मूळ पंजाबची असलेली २१ वर्षीय विद्यार्थिनी हरसिमकर रंधावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपीला अटक केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >