Nashik : नाशिक विधान परिषद निवडणुकीची चुरस वाढली, आतापर्यंत 'इतक्या' उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर 17 सदस्यांची निवड होणार आहे. आमदार म्हणून विधान परिषदेवर जाणारे हे 17 सदस्य कोण असतील? त्यासाठी राजकीय वर्तुळात विविध नावांची चर्चा सुरु आहे. जळगाव, नाशिक, ठाणे-पालघर अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधून हे उमेदवार विधान परिषदेसाठी निवडण्यात येतील. दरम्यान नाशिक विधान परिषदेच्या जागेवरुन महायुतीमध्ये अंतर्गत संघर्षाची चिन्हे आहे.


कारण नाशिक विधान परिषदेच्या जागेवर आता सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुद्धा दावा केला आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीत तीव्र रस्सीखेच आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची या संदर्भात भेट देखील घेतली. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही दावा ठोकला आहे.


दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणूक-2026 नामनिर्देशनपत्र विक्री व दाखल बाबतचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये आतापर्यंत फिरोज गफार शेख, प्रतिक प्रभाकर खराटे, केदा तानाजी आहेर, नरेंद्र भिकाजी दराडे, अजित हिरामण पवार, सुनिल रंगनाथ सानप, शाने हिंद निहाल अहमद, मोहम्मद खालिद अब्दुल रशीद, दिपीका चव्हाण, संजय कांतीलाल चव्हाण, प्रसाद पांडुरंग जमखिडीकर, विजय देविदास धारराव यांचे नामनिर्देशन पत्र घेण्यात आले आहे. यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे इच्छुक आहेत. तर आज २७ मे रोजी निवृत्ती देवराम बोडके, बाळकृष्ण मधुकर माळी, बाळकृष्ण मधुकर माळी, भुषण जयचंद कासलीवाल यांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.




विक्री झालेले नामनिर्देशन पत्र असे ( राजकीय पक्ष निहाय )


भारतीय जनता पार्टी - २


राष्ट्रवादी पार्टी (शरद पवार गट) - २


राष्ट्रवादी काँग्रस (अजित पवार गट ) - १


समाजवादी पार्टी - १


इस्लाम पार्टी - १


अपक्ष - ९

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय