Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी झालेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीनंतर JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि अनियमिततेविरोधात विद्यार्थी आंदोलन करत होते. सरकारच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये जल्लोष केला. (Jharkhand News)



परिक्षा रद्द करण्याचा निर्णय


मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले की, JSSC-CGL सोबतच संबंधित संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षा, जाहीर झालेले निकाल आणि उमेदवारांच्या निवडीशी संबंधित प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. 2014 पासून झालेल्या छोट्या-मोठ्या त्रुटींचीही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Hemant Soren)



परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने नवीन सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना आपल्या सूचना देता याव्यात यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या सूचनांचा तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करून परीक्षा प्रक्रियेत आवश्यक बदल केले जाणार आहेत. (Jharkhand Students)



नवीन समितीची स्थापना


तसेच IAS अधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी विविध संस्था, तज्ज्ञ आणि जाणकारांशी चर्चा करणार आहे. भविष्यात परीक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी नवीन नियम आणि कार्यपद्धती तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. (India News)



देवेंद्र नाथ महतो यांनी उपोषण सोडले


दरम्यान, आंदोलन करणारे विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी रांचीच्या सदर रुग्णालयात आमरण उपोषण सोडले. मंत्री दीपिका पांडे सिंह, मंत्री इरफान अन्सारी आणि जेएलकेएमचे आमदार जयराम महतो यांनी त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.


मात्र, विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशीची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आंदोलन पूर्णपणे संपलेले नसल्याचे विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थी नेते रवींद्र पासवान यांनी सीबीआय चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका मांडली. (Exam Cancelled)


देवेंद्र नाथ महतो यांनीही सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले, मात्र अजून मोठा लढा बाकी असल्याचे सांगितले. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे हे पुढील उद्दिष्ट असल्याचे विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.


Comments
Add Comment

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात

Shahzad Bhatti Network : केंद्र सरकारची मोठी कारवाई : ISI समर्थित ‘शहजाद भट्टी नेटवर्क’चा पर्दाफाश; १४ राज्यांतून २५३ जण ताब्यात

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केंद्र

Smriti Irani News : भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महिलांना मोठं स्थान; स्मृती इराणींचे मुख्य संघटनेत दणकेबाज कमबॅक!

नवी दिल्ली : आगामी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या नव्या