Nashik : जिच्यासाठी घरदार सोडले तीच जीवावर उठली, पंचवटी हत्याकांडप्रकरणातील मुख्य संशयित गजाआड

Nashik Crime News : नाशिकच्या पंचवटी परिसरातील पेठ रोड येथे २६ वर्षीय प्रियकराचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना नवनाथनगर येथे समोर आली. ३६ वर्षीय विवाहित महिलेने तिच्याच २६ वर्षीय प्रियकराचा गळा आवळून खून केला. अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले असून पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) याप्रकरणी मुख्य संशयित महिलेला तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत.



नेमकं प्रकरण काय ?


प्राथमिक माहितीनुसार, मृत अमोल पंढरीनाथ दांडगे (Amol Dandage) (२६, रा. चौधरी मळा, हनुमानवाडी, पंचवटी) हा संशयित सोनाली राजेंद्र गायकवाड (Sonali Gaikwad० (३६, रा. साळवे चाळ, नवनाथनगर) या महिलेच्या प्रेमात होता. या दोघांत गेल्या काही काळापासून अनैतिक संबंध होते. अमोलच्या या संबंधांना त्याच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. मात्र, प्रेमात आंधळा झालेल्या अमोलने घरच्यांचा विरोध झुगारून देत १५ दिवसांपूर्वीच हनुमानवाडीतील आपले घर सोडून पेठ रोडवरील नवनाथनगर येथील साळवे चाळीत सोनालीसोबत भाड्याच्या खोलीत राहण्यास गेला होता. (Panchavati Crime News)



ज्या प्रेयसीसाठी घर सोडले, तिनेच घात केला


मात्र, ज्या प्रेयसीसाठी त्याने घर सोडले, तिनेच त्याचा घात केला. सोमवारी ९.३० ते मंगळवारी (दि. २६) पहाटे ३ च्या दरम्यान ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, रात्री १ च्या सुमारास अमोल आणि सोनाली यांच्यात अनैतिक संबंध आणि पैशांच्या देवाणघेवाणीवरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संशयित सोनालीने राग अनावर झाल्याने कशाच्या तरी साहाय्याने अमोलचा गळा आवळला. (Nashik Crime News )



गळ्यावरील व्रणामुळे संशय बळावला


मृत युवकाच्या परिस्थितीजन्य पुराव्यावरून हा खून केवळ एका महिलेने केला नसून तिने अन्य साथीदारांची मदत घेतली असावी. निपचित पडलेल्या अमोलला सोनालीने इतरांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा तिने डॉक्टरांना चक्कर येऊन पडल्याचे सांगितले. मात्र, अमोलच्या गळ्यावरील व्रण मात्र हा वेगळाच प्रकार असल्याचे दर्शवत होते. शवविच्छेदन अहवालात अमोलचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट होताच पंचवटी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवून सोनालीला ताब्यात घेतले.



पंचवटी पोलिसांकडून तपास सुरु


या गुन्ह्यात तीन संशयित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी अमोलचा मोठा भाऊ संदीप पंढरीनाथ दांडगे याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित सोनाली राजेंद्र गायकवाड (३६, रा. साळवे चाळ, नवनाथनगर) हिच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल झाला असून तिला अटक करण्यात आली आहे. पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी मुख्य संशयित सोनालीला तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत. तर मंगला गायकवाड व वैशाली खरात या दोघींची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Antara Banerjee : अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अटक; ट्रेनमध्ये आरपीएफ जवानांवर केला रेझरने हल्ला

मुंबई : मॉडेल आणि वेब सिरीज अभिनेत्री अंतरा बॅनर्जी (३१) हिला १२ ऑगस्ट रोजी अरवली एक्सप्रेसमध्ये जागेचे आरक्षण

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता