Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक डेअरी अँड स्वीट्स या आस्थापनाचा परवाना निलंबित केल्यानंतरही तो पूर्ववत न केल्याप्रकरणी न्यायालयाने FDA ला तब्बल ५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. (Bombay High Court on FDA)


FDA ने १३ जून रोजी नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण देत संबंधित दुकानाचा परवाना निलंबित केला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या पुनर्तपासणीत दुकानाने तब्बल ९८ टक्के नियमांचे पालन केल्याचे समोर आले. मात्र, त्यानंतरही परवाना पूर्ववत करण्यात आला नाही. त्यामुळे संबंधित व्यावसायिकाने न्यायालयात धाव घेतली. (Bombay High Court on FDA)



या प्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने FDA च्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासनाने परिस्थितीनुसार आणि प्रमाणबद्ध पद्धतीने कारवाई करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाच्या भूमिकेतून स्पष्ट झाले. (Bombay High Court on FDA)


दरम्यान, गेल्या काही आठवड्यांत FDA कडून हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी आणि खाद्य व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. यापूर्वीही मुंबई उच्च न्यायालयाने FDA ला कारवाई करताना योग्य प्रक्रिया आणि न्याय्य निकष पाळण्याचे निर्देश दिले आहेत. काही प्रकरणांमध्ये परवाना थेट निलंबित करण्याऐवजी संबंधितांना त्रुटी सुधारण्याची संधी देणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. (Bombay High Court on FDA)



यामुळे अन्न सुरक्षेच्या दृष्टीने कठोर कारवाई गरजेची असली, तरी कारवाईचा अतिरेक होऊ नये आणि प्रशासनाने आपल्या अधिकारांचा विवेकपूर्ण वापर करावा, हा संदेश या निकालातून FDA ला मिळाला आहे. FDA च्या कारवाईवर उच्च न्यायालयाची नजर असल्याने आता प्रशासन पुढील कारवाई कशी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Bombay High Court on FDA)

Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के

Jaykumar Rawal and Shambhuraj Desai : आग्रा येथील शिवपराक्रम नव्या पिढीपर्यंत; १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार