Wednesday, May 27, 2026

Sairat :आकाश सोबतच्या पोस्टवर अखेर रिंकू राजगुरूने स्वत: केला खुलासा !

Sairat :आकाश सोबतच्या पोस्टवर अखेर रिंकू राजगुरूने स्वत: केला खुलासा !
सैराट चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टिला एक वेगळी दिशा मिळाली. जगभरात १०० कोटींची कमाई करणारा 'सैराट' हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या लोकप्रिय चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. यामध्ये या दोघांनी अनुक्रमे आर्ची-परश्या (अर्चना-प्रशांत) या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटामुळे रिंकू-आकाशची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली.
‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित होऊन आज जवळपास १० वर्षे उलटली आहेत. तरीही प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल आणि गाण्यांबद्दलच वेड कायम आहे. रिंकू आणि आकाशला एकत्र पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. रिंकू-आकाशने अलीकडेच उद्योजिका उषा काकडे यांच्या नातवाच्या बारशाला एकत्र हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सुंदर फोटोशूट केलं होतं. रिंकू-आकाशच्या एकत्र फोटोंवर चाहते नेहमीच कमेंट्सचा वर्षाव करतात. अनेकदा हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही त्यांच्या चाहत्यांमध्ये रंगल्या होत्या. यावर रिंकूने इन्स्टाग्राम ‘आस्क मी क्वेस्चन’(Ask me a question) मध्ये खुलासा केला आहे. “आम्ही फक्त छान मित्र आहोत” असं रिंकूने त्यांच्या चाहत्यांना सांगितलं आह
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >