मुंबई : धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वर बॉलिवूडने बंदी घालण्यात आल्याचे वृत्त आले. या प्रकरणी आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज या संघटनेने अर्थात FWICE ने स्पष्टीकरण अर्थात एक खुलासाच दिला आहे. ‘डॉन 3’ चित्रपटासाठी रणवीर निश्चित झाला होता, या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनवर आधीच ४५ कोटी रुपये खर्च झाले होते. मात्र रणवीर अचानक चित्रपटातून बाहेर पडला. त्यामुळे फरहानने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) कडे तक्रार दाखल केली. FWICE ने 'असहकार निर्देश' जारी केला आहे. ही बंदी नसून, सदस्यांना रणवीरसोबत काम न करण्या
चे आवाहन आहे, असे अशोक पंडित म्हणाले. ते FWICE चे पदाधिकारी आहे. कोणत्याही अभिनेत्यावर कायदेशीर बंदी घालण्याचा अधिकार संस्थेला नाही. मात्र FWICEने चित्रपट उद्योगातील विविध क्षेत्रांतील कामगारांसाठी नॉन-कोऑपरेशन (असहकार )निर्देश जारी केले आहेत, असेही ते म्हणाले.
एका चित्रपटाचे काम सुरू झाले होते. रणवीरसोबतच्या कामाचे नियोजन करण्यात आले होते. सुमारे ४५ कोटी रुपयांचा खर्च झाला होता, असे दिग्दर्शक फरहानने सांगितले. या टप्प्यावर अचानक रणवीरने माघार घेतली आहे. या पद्धतीने कोणताही कलाकार आयत्यावेळी निर्णय बदलणार असेल तर निर्मात्याचे प्रचंड नुकसान होईल. एखाद्यावर आत्महत्येचीच वेळ येईल. त्यामुळे ही पद्धत
थांबली पाहिजे. व्यावसायिकता जपली पाहिजे.
माघार घेणाऱ्याने चर्चा करून निर्मात्याचे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती भरपाई देऊन तोडगा काढणे आवश्यक आहे. फरहान अख्तर आणि रणवीरने परस्पर चर्चा केली आणि मार्ग काढला तर FWICE त्याचे स्वागत करेल. पण कोणाचेही नुकसान कलाकाराने मधूनच चित्रपट सोडू नये. प्री प्रॉडक्शनवर ४५ कोटींचा खर्च झाला असताना अचानक चित्रपट सोडणे योग्य नाही, असे अशोक पंडित म्हणाले.