Asaram Bapu :आसाराम बापूला हायकोर्टाचा मोठा झटका

Asaram Bapu :ल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात आसाराम बापू याला हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. आसाराम बापू याला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा राजस्थान हायकोर्टाने कायम ठेवली आहे. आसाराम बापूचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावलय. मात्र त्‍याला अंशतः दिलासा देत सामूहिक बलात्कार (गँगरेप) आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता केली आहे.


नेमकं प्रकरण काय ?


२०१३ मध्‍ये हे प्रकरण समोर आले. जोधपूर येथील आश्रमात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप झाले. तपासाअंती पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये विशेष पोक्सो न्यायालयाने आसारामला दोषी ठरवत नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत (उर्वरित आयुष्यासाठी) जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निकाला विरोधात आसारामने उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती.



राजस्‍थान उच्‍च न्‍यायालयाच्‍या न्यायमूर्ती अरुण कुमार मोंगा आणि न्यायमूर्ती योगेंद्र कुमार पुरोहित यांच्या खंडपीठासमोर आसारामच्‍या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्याची आसारामची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिका फेटाळताना खंडपीठाने स्पष्ट केले की, भारतीय दंड संहितेअंतर्गत (IPC) बलात्काराचा आरोप, पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत लैंगिक छळाचा आरोप आणि बाल न्याय (जेजे) कायद्यांतर्गत असलेले गुन्हे सिद्ध झाले आहेत.


सामूहिक बलात्कार आणि गुन्हेगारी कटाशी संबंधित आरोप कायम ठेवण्यासाठी रेकॉर्डवरील पुरावे पुरेसे नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यासोबतच, उच्च न्यायालयाने आसारामचे २ सहकारी यांना दिलासा दिला आहे. शरदचंद्र आणि शिल्पी यांची या सर्व आरोपातून मुक्तता केली आहे. यापूर्वी विशेष न्यायालयाने या दोघांनाही २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.


ऑक्टोबर २०२५ पासून आसाराम वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर बाहेर आहे. त्यापूर्वी, मार्च २०२४ मध्ये उपचारासाठी पहिल्यांदा अल्पमुदतीचा दिलासा मिळाल्यानंतर त्याला अनेक वेळा तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या अंतरिम जामिनाची मुदत ७ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू