Mark Zuckerberg : पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ काढणं मेटाला महागात पडणार? मार्क झुकरबर्गना संसदीय समितीचा ३ दिवसांचा अल्टिमेटम; “माफी मागा अन्यथा…”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक महत्त्वाचा व्हिडिओ काही तासांसाठी फेसबुकवरून (Facebook) हटवल्याच्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीने मेटा (Meta) चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांना तीन दिवसांत बिनशर्त माफी मागण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यानुसार मेटाला मिळणारे कायदेशीर संरक्षण मागे घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा... :


लोकसभा सचिवालयाकडून पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार, झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी पत्र मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागितली नाही, तर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९(३) अंतर्गत मेटाला मिळणारी 'इंटरमीडियरी' (मध्यस्थ) म्हणून असलेली कायदेशीर सवलत रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. हे संरक्षण हटवल्यास फेसबुकसह मेटाच्या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणाऱ्या वादग्रस्त किंवा बेकायदेशीर मजकुरासाठी कंपनी आणि तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट प्रकाशक म्हणून फौजदारी अथवा अन्य कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.



नेमकं काय घडलं?


माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत गृह मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) तसेच मेटासह विविध सोशल मीडिया कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विद्यार्थ्यांना केलेले संबोधन असलेला व्हिडिओ फेसबुकवर सुमारे पाच ते सहा तास उपलब्ध नव्हता, हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.



या प्रकारावर समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, लोकसभेच्या संचालक ए. ज्योतिर्मयी यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांना पाठवलेल्या पत्रात या घटनेची गंभीर दखल घेतल्याचे नमूद केले आहे.


दरम्यान, या प्रकरणामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी, पारदर्शकता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील उत्तरदायित्व याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी