DCM Eknath Shinde : मोदी खरे धुरंदर, त्यांच्यावर टीका करणारे दलिंदर, हर्षवर्धन सकपाळ यांच्या मोदीवरील टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत देशाचे यशस्वीपणे नेतृत्व करत भारताला विकास, आत्मनिर्भरता आणि जागतिक प्रतिष्ठेच्या नव्या उंचीवर नेले आहे. त्यामुळे मोदी हे खरे “धुरंदर” असून त्यांच्यावर टीका करणारेच खऱ्या अर्थाने “दलिंदर” आहेत, अशी खरबरीत आणि आक्रमक टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि विरोधकांवर केली. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोदींवरील टीकेचा तीव्र शब्दांत समाचार घेतला.
शिंदे म्हणाले,“देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे नरेंद्र मोदी हे आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत.



गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे आणि देशाचे पंतप्रधान म्हणून १२ वर्षे त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. भारताला महासत्तेकडे नेण्याचे, आत्मनिर्भर भारत उभारण्याचे आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे ऐतिहासिक कार्य मोदीजींनी केले आहे.”


विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, “ज्यांनी आयुष्यात देशासाठी कोणतेही भरीव योगदान दिले नाही, ते आज मोदीजींवर टीका करत आहेत. ‘कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली’ अशीच त्यांची अवस्था आहे. मोदीजींवर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. अशा टीकांमुळे मोदींची प्रतिमा कमी होणार नाही, उलट विरोधकांची राजकीय दिवाळखोरीच उघड होत आहे.”


“मोदीजींनी देशाला भ्रष्टाचारमुक्त आणि निर्णयक्षम नेतृत्व दिले. संरक्षण क्षेत्रात भारताला आयातदारातून निर्यातदार बनवले. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक सुधारणांमुळे भारताची जागतिक पातळीवरील ताकद वाढली आहे. बारा वर्षांच्या कार्यकाळात मोदीजींवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लावता आलेला नाही. हीच त्यांच्या नेतृत्वाची सर्वात मोठी पावती आहे, असेही शिंदे म्हणाले.



काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना त्यांनी स्पष्ट केले की, "देशाच्या पंतप्रधानांवर खालच्या दर्जाची भाषा वापरणे ही भारतीय संस्कृती नाही. राजकीय विरोध असू शकतो, पण वैयक्तिक पातळीवर घसरून केलेली टीका जनता कधीही सहन करणार नाही. १४० कोटी भारतीय मोदीजींच्या कामगिरीचे साक्षीदार आहेत आणि योग्य वेळी विरोधकांना उत्तर देतील.”

Comments
Add Comment

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा

CM Devendra Fadnavis : 'दहीहंडी'च्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी प्रयत्न करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; वरळीत दिमाखात पार पडले 'प्रो-गोविंदा' लीगचे उद्घाटन मुंबई :