Malad-Goregaon Encroachments : वांद्रेनंतर आता मालाड-गोरेगावमध्ये धडक कारवाई! पश्चिम रेल्वेचा बुलडोझर अतिक्रमणांवर चालला

मुंबई : मुंबईतील रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेने आता मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू केली असून, वांद्रे पूर्वेतील कारवाईनंतर आता Goregaon आणि Malad परिसरातील झोपड्या आणि बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या या कारवाईमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. (Malad-Goregaon Encroachments)



पश्चिम रेल्वेकडून गोरेगाव आणि मालाड स्थानकांदरम्यान पूर्वेकडील रेल्वेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुमारे १५०० चौरस मीटर जागेवर बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली होती. या ठिकाणी ३६ पक्की आणि २४ तात्पुरती बांधकामे उभारण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत २६ पक्की बांधकामे हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. (Malad-Goregaon Encroachments)



रेल्वे विस्तारासाठी जागा मोकळी : 


रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जागा भविष्यात हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. मुंबईतील वाढती प्रवासी संख्या आणि रेल्वेवरील ताण लक्षात घेता रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार अत्यावश्यक बनला आहे. यामुळे रेल्वेची क्षमता वाढवणे, प्रवास अधिक सुरक्षित करणे आणि रेल्वे रुळांवरील अतिक्रमणामुळे होणारे अपघात रोखणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. (Malad-Goregaon Encroachments)



परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त : 


अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वे अधिकारी, महापालिका कर्मचारी आणि पोलीस यांच्या उपस्थितीत संपूर्ण कारवाई पार पडत आहे. काही ठिकाणी रहिवाशांकडून विरोधाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे. (Malad-Goregaon Encroachments)



वांद्रे पूर्वेनंतर पुन्हा मोठी मोहीम : 


काही दिवसांपूर्वीच Bandra East येथील गरीबनगर परिसरातही पश्चिम रेल्वेकडून मोठी अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आली होती. त्या कारवाईनंतर आता मालाड-गोरेगाव भागातील मोहीम अधिक चर्चेत आली आहे. आगामी रेल्वे प्रकल्प, ट्रॅक विस्तार आणि सुरक्षेच्या दृष्टीने अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. (Malad-Goregaon Encroachments)


दरम्यान, या कारवाईमुळे अनेक कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली असून स्थानिकांकडून पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या विषयावर राजकीय आणि सामाजिक स्तरावरही चर्चा रंगण्याची शक्यता आहे.




Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान