भारतीय लष्करातील धडाडीच्या महिला अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांनी आपल्या कर्तृत्वाने जागतिक पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्या भारतीय लष्करातील पहिल्या महिला कॉम्बॅट एव्हिएटर (लढाऊ हेलिकॉप्टर पायलट) आहेत. नुकतेच त्यांना संयुक्त राष्ट्रांचा (UN) प्रतिष्ठित 'मिलिटरी जेंडर एडव्होकेट ऑफ द ईयर अॅवॉर्ड २०२५' जाहीर झाला आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी सोमवारी देशातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १३१ मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी ...
पश्चिम आशियाई देश लेबनॉनमध्ये तैनात असताना महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनने शुक्रवारी म्हटले की, मेजर अभिलाषा बडक यांना २०२५ च्या या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याची घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. महिला आणि किशोरवयीन मुलींशी त्यांचा सामुदायिक संवाद आणि शांती रक्षकांसाठी लैंगिक संवेदनशीलता प्रशिक्षणातील योगदानाबद्दल हा गौरव केला जात आहे.
- ३० जूनआधी योजनेची अंमलबजावणी होणार मुंबई : विधानपरिषद निवडणुकीमुळे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर केंद्रीय ...
मेजर अभिलाषा या हा पुरस्कार मिळवणाऱ्या देशातील तिसऱ्या महिला आहेत. संयुक्त राष्ट्र मुख्यालयात २९ मे रोजी त्यांना सन्मानित करण्यात येईल. त्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर पायलट देखील आहेत. यापूर्वी मेजर सुमन गवानी आणि मेजर राधिका सेन यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
- मुंबईतही ‘कुर्बानी’वरून भाजप आक्रमक मीरा रोड : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर Mira Road आणि मुंबई परिसरातील वातावरण तापू लागले आहे. मिरा रोडमधील एका हाउसिंग ...
रोहतकच्या बालंद गावची लेक मेजर अभिलाषा आता ग्रामीण भागातील मुलींना आत्मनिर्भर आणि सक्षम करण्याच्या मोहिमेत सहभागी होणार आहेत. त्यांनी गावातील मुलींना सैन्य, खेळ, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकासाशी जोडण्याचा संकल्प केला आहे. मेजर अभिलाषा यांचे वडील कर्नल ओम सिंह बडक (जे सध्या पंचकुला येथे राहतात) यांनी सांगितले की, या संदर्भात लवकरच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याकडे ते प्रस्ताव पाठवणार आहेत. या प्रस्तावांतर्गत बेरी आणि सतगामा क्षेत्रात मुलींसाठी बिगर राजकीय विशेष प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची योजना आहे. ग्रामीण मुलींना योग्य दिशा, आत्मविश्वास आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी एक व्यासपीठ देऊन त्यांना सक्षम करणे हे तिचे ध्येय आहे.






