गुलमर्ग : गुलमर्ग गोंडोला या नावाने प्रसिद्ध असलेली गुलमर्गची केबल कार सेवा तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आणि सुमारे ३०० पर्यटक संकटात सापडले. लष्कर, ...
एक मराठी दांपत्य गोवा फिरण्यासाठी गेले होते. या दांपत्याने बड्या हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. रात्री बुक केलेल्या रूममध्ये दांपत्य विश्रांती घेत होते. ते गाढ झोपेत होते, त्यावेळी हॉटेलचा कर्मचारी मास्टर की वापरून थेट रूमध्येच शिरला
गुलमर्ग : गुलमर्ग गोंडोला या नावाने प्रसिद्ध असलेली गुलमर्गची केबल कार सेवा तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आणि सुमारे ३०० पर्यटक संकटात सापडले. लष्कर, ...
">. परवानगी न घेताच हॉटेलचा कर्मचारी रात्रीच्या वेळी रूममध्ये घुसला होता. ही धक्कादायक घटना रात्री बाराच्या सुमारास घडली. दांपत्य गाढ झोपेत होते. पण कोणीतरी रूमचे लॅच उघडत असल्याची जाणीव होताच पतीला जाग आली त्याने रूममध्ये शिरत असलेल्याला जाब विचारला. आपल्याला जाब विचारत असल्याचे लक्षात येताच रूममध्ये घसणाऱ्याने दरवाजातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पतीने लगेच दरवाजाजवळ तिथे कोण होते ते तपासले. त्यावेळी हॉटेलचा कर्मचारीच रूममध्ये घुसखोरी करत असल्याचे त्याच्या लक्षात आले.
मुंबई : महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई या नुतनीकृत वास्तूचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चर्नी रोड येथे करण्यात आले. ...
पतीने हॉटेलच्या कर्मचाऱ्याला तू इथे का आलास आणि काय करत होतास असा सवाल केला. त्यावेळी एक कॉल आला आणि या रूमचा एसी चालत नसल्याची तक्रार आली म्हणून आलो असे अनाकलनीय कारण कर्मचाऱ्याने दिले. पण कॉल केलाच नव्हता असे सांगितल्यावर कर्मचारी घाबरला. अखेर कर्मचाऱ्याला हॉटेल मॅनेजरकडे नेण्यात आले त्यावेळी अतिरिक्त बेडची मागणी आली म्हणून कर्मचारी त्या रूमच्या दिशेने गेला असे मॅनेजरने सांगितले. पण मास्टर की चा वापर झाल्याचे त्यालाही माहिती नव्हते, असे त्याचे म्हणणे होते. या प्रकरणी आता पोलिसांत तक्रार झाली असून तपास सुरू आहे.