लातूर : प्रोफेसर शिवराज मोटेगावकरांच्या संपत्तीवर ईडीची नजर देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट-यूजी परीक्षा पेपरफुटी प्रकरणाला आता एक मोठे आर्थिक वळण मिळाले आहे. या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अटकेनंतर आता अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने या प्रकरणात अधिकृत एन्ट्री केली आहे. लातूर येथील प्रसिद्ध 'आरसीसी' कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर आता ईडीच्या रडारवर आले असून, त्यांच्या अफाट संपत्तीची आणि मनी लाँड्रिंगच्या कोनातून चौकशी सुरू झाली आहे. (NEET Paper Leak Case)
मुंबई : राज्यात “बकरी ईद” निमित्त संभाव्य गोवंश हत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. ...
मुंबई : पालघर जिल्ह्यातील धानिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ...
यापूर्वी सीबीआयने लातूर आणि पुण्यात मॅरेथॉन चौकशी केल्यानंतर शिवराज मोटेगावकर यांना रविवारी रात्री ताब्यात घेऊन दिल्लीत नेले होते, जेथे न्यायालयाने त्यांना ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या तब्बल १० दिवस आधी, म्हणजेच २३ एप्रिल २०२६ रोजीच शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलवर नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सी साठी मराठी भाषांतरकार म्हणून काम करणारे निवृत्त केमिस्ट्री प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी (ज्यांना आधीच अटक झाली आहे) यांच्याशी मोटेगावकरांचे थेट कनेक्शन होते. कुलकर्णी यांच्याकडूनच मोटेगावकरांना पेपर मिळाल्याचा संशय आहे. (NEET Paper Leak Case)
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत (Suryakant) यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ या वादग्रस्त मुद्द्यावर ...
या प्रकरणात पुणे आणि लातूरमधील काही डॉक्टर, आयुर्वे दिक तज्ज्ञ आणि मध्यस्थांची साखळी कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले असून, मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरे या महिला आरोपींच्या घरातून लाखो रुपयांची रोकड, जळालेल्या प्रश्नपत्रिकांच्या नोट्स आणि संशयास्पद व्हॉट्सप चॅट्स हस्तगत करण्यात आले आहेत. शिवराज मोटेगावकर यांच्यावर पुरावे नष्ट करणे, एनटीए अधिकाऱ्यांसोबत गुन्हेगारी कट रचणे यासाठी भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) कायदा, २०२४ अंतर्गत अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता ईडीच्या एन्ट्रीमुळे त्यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली असून, महाराष्ट्रातील कोचिंग लॉबीचे मोठे रॅकेट उद्धस्त होण्याची शक्यता आहे. (NEET Paper Leak Case)




