दोन डोळे

जीवनगंध; पूनम राणे


ताई, ताई... ”
“काय गं”
“तिकडे बघ”
“एकटीच मुलगी बसलीय”
“चल जाऊ या तिच्याकडे!”
“चल, चल”
“ताई, तू एकटी का बसलीस?”
“तुझ्यासोबत कोणी नाही.”
“नाही”
“मी काकांकडे राहते.”
माझे काका, काकी आणि माझी चुलत भावंडे त्यांच्या मामाच्या घरी गेलेत.
“तू नाही गेलीस!”
नाही, असं म्हणत तिने आपला चेहरा रडवेला केला.
“तू नको वाईट वाटून घेऊस.”
“चल आमच्यासोबत खेळायला.”
“नाही, नको!”
“चल गं, मज्जा करूया. घसरगुंडीवर जाऊ या, झोपाळ्यावर बसू या.”
“चल, चल गं तायडे!”असं म्हणून त्यांनी तिचा हात धरला.
आता ताईची कळी खुलली. ती खुदकन हसली.
“घसरगुंडी, झोपाळा किती मजा येते न खेळायला!”
“ए,जुई आता मला फार भूक लागली.”
“काहीतरी खाऊया.”
“हा खाऊचा डबा आणि बाटली आईने दिली आहे.”
“चला आपण खाऊन घेऊ!”
“वेदू ,चल गं तू पण!”
“मला नको!”
“तुम्ही खा दोघी.”
“असं, कसं मला नको!
अगं, वाटून खायचं असतं असे आई आणि शाळेत बाई सांगतात.
“तू आजपासून आमची मैत्रीण, जीवाभावाची!”
“हो, ना गं ताई, बरोबर आहे ना!”
“हो, गं जुई.”
आता तिघी जणी खेळायला निघाल्या.
जाई म्हणाली, “चला आता आपण चित्र काढूया!”
“फुलपाखरे इतकी छान खेळतात, या फुलावरून त्या फुलावर!”
सप्तरंगी, नाजूक फुलपाखरे किती छान बागडतात आपल्याच नादात!”
“जुई म्हणाली,”
“चला, आपण फुलपाखरांची चित्रे काढूया.”
तिघींनी छोटे कागद घेतले आणि फुलपाखरू काढायला सुरुवात केली.
“अगं, जाई, जुई येताय ना घरला!” चला लवकर. “आई वाट पाहत असेल!”
“अहो काका, दहा मिनिटं थांबा निघू या!” आम्हाला फुलपाखरू रंगवायचं आहे”
“जुई, किती सुंदर रंग!”
“अप्रतिम, कोण देत असेल गं या फुलपाखरांना असे रंग!”
“कोण म्हणजे परमेश्वर! तुमचा आमचा बाप्पा.
“जाई, जुई... घरी निघायचं आहे ना... आई वाट पाहतेय... ”
पुन्हा काकांनी आवाज दिला.
“हो, हो चला, काका निघू या...”
“ चल बाय वेदू पुन्हा भेटू या. छ
“अगं, आज फार वेळ रमलात बागेत, आई म्हणाली.”
आई, आज किनई आम्हाला नवीन मैत्रीण भेटली, तिचे नाव वेणूताई.
मग आम्ही छान छान रंगीत फुलपाखरांची चित्र काढली.”
“रंगवली नाहीत.”
“अरे वा!” किती छान!”आणि डोळे किती छान काढलेत गं, छोटे छोटे लुकलुकणारे!”
“रंग नाही दिला.”
“नाही, आता रंगवणार आहोत.”
ड्रायव्हर काकांनी घाई केली. तू वाट बघत असतील असं म्हणाले.” म्हणून लवकर आलो.
“माझ्या लाडक्यानो, किती सुंदर फुलपाखरं काढलीत तुम्ही दोघींनी!”
“आई दोघींनी नाही, तिघींनी.”
आम्हाला आता नवीन मैत्रीण मिळालीय वेणूताई.
“अरे वा! छान, छान”
आता दोघीही लाडात आल्या आणि आईच्या गळ्यात पडल्या.
आईने दोघींच्या गालाचा पापा घेतला आणि म्हणाली, “तुम्ही दोघी नं, माझे दोन डोळे आहात!”
“दोन डोळे!”
जुई म्हणाली, “मग सांग, खरं खरं सांग तुझा उजवा डोळा कोणता? जाई की जुई?”
“अगं उजवा आणि डावा असं काही नसतं, दोन्ही डोळ्यांनी सारखंच दिसतं आई म्हणाली.”
आईच्या या वाक्यावर दोघी आईकडे पाहतच राहिल्या आणि आपली आई किती छान बोलते, याचा विचार करू लागल्या. जाईने चित्र रंगवायला घेतलं. जुहीने कागद-पेन घेतला आणि लिहू लागली.
“तुम्ही माझे दोन डोळे
म्हणाली आमची आई ॥
उजवा की डोळा
उत्तराला आतुर जाई जुई ॥
दोन डोळे समान दृष्टी
भेदभाव नाही ॥
सुसंवादी आमची आई
गोड मंजुळ तिची वाणी॥
संस्काराने या मैत्रीण लाभली
आज बागेत वेणुताई.

Comments
Add Comment

पाप आणि प्रायश्चित्ते

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे धर्मशास्त्र व पुराणात मनुष्यासाठी धर्माचरण व आचरणाचे नियम सांगितलेले

तुज आहे तुजपाशी...

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे नीटच्या परीक्षेचं पेपरफुटीचं प्रकरण घडून

“मुझे दोस्त बनके दगा न दे...”

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे पूर्वी चित्रपटसृष्टीत हिंदी-उर्दूत लिहिणारे आणि अस्खलित उर्दू, फारसी, अरबी

यशस्वी होण्याचे रहस्य : हुशारी की सातत्य?

आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू ज्याची मुले नेहमी यशस्वी होतात त्या पालकांचा आणि त्यांच्या मुलांचा इतरांना

शपथ

- नक्षत्रांचे देणे; डॉ. विजया वाड बाबुराव नंबर वन बाहेरख्याली आहेत नलू.” “असेनात का? आपल्याला काय करायचं

लग्नाचा वाढदिवस

- मनस्विनी; पूर्णिमा शिंदे मे महिना आला की, लग्नाचे वाढदिवस. सर्वांचेच सारखेच आनंदाने भरलेले. त्या संसाराच्या सुख