Bollywood News : बॉलिवूडच्या झगमगाटामागचं वास्तव! २० तास काम, तरीही मोबदला नाही; FWICE अध्यक्षांचा आरोप

मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) सुपरस्टार्सच्या मानधनाचे आकडे दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना त्यांच्या बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची भर पडत आहे. मात्र, दुसरीकडे ज्यांच्या मेहनतीच्या जोरावर संपूर्ण फिल्म इंडस्ट्री (Film Industry) उभी आहे, त्या पडद्यामागील तंत्रज्ञ (Technicians), स्पॉट बॉईज, लाईटमन आणि इतर कामगारांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. याच गंभीर समस्येकडे लक्ष वेधत 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉयज' (FWICE) चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला कठोर शब्दांत इशारा दिला आहे.



२०-२० तास काम, तरीही हक्काचा मोबदला मिळत नाही


ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना बी. एन. तिवारी यांनी चित्रपट आणि मालिका क्षेत्रात काम करणाऱ्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली. त्यांच्या मते, सध्या अनेक कामगारांकडून दिवसाला तब्बल २० ते २० तास काम करून घेतले जाते. या दीर्घ कामाच्या कालावधीत त्यांना पुरेशी विश्रांती किंवा ब्रेकदेखील दिला जात नाही. धक्कादायक बाब म्हणजे, इतके तास काम करूनही त्यांना किमान ८ तासांच्या कामाचे जे मूलभूत मानधन (Basic Payment) मिळायला हवे, तेही वेळेवर मिळत नाही. अनेक वेळा पूर्ण रक्कम न देता कामगारांची आर्थिक कोंडी केली जाते. परिणामी, पडद्यामागील हजारो कामगार आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.



OTT प्लॅटफॉर्म्सच्या वाढीमुळे दबाव आणखी वाढला


तिवारी यांनी सांगितले की, ओटीटी प्लॅटफॉर्म्स (OTT Platforms) आणि डिजिटल कंटेंटच्या वाढत्या स्पर्धेमुळे निर्मात्यांचा भर दर्जेदार कामापेक्षा अधिकाधिक आऊटपुट (Output) मिळवण्यावर राहिला आहे. त्यामुळे कामगारांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. घरखर्च भागवण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक कामगार कमी मानधनावरही काम करण्यास भाग पडतात. निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसेस याच परिस्थितीचा फायदा घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खराब कामाचे वातावरण, अपुरी सुविधा आणि विलंबाने होणारे पेमेंट या समस्यांचा सामना कामगारांना रोज करावा लागत आहे.



काम पूर्ण झाल्यावर निर्माता गायब होण्याचेही प्रकार


बी. एन. तिवारी यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. अनेक वेळा एखाद्या प्रोजेक्टचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित निर्मिती संस्था किंवा निर्माता संपर्काबाहेर जातो. परिणामी, कामगारांचे थकीत पैसे अडकून राहतात. अनेकांना महिनोनमहिने त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळत नाही. त्यांनी सांगितले की, मोठे कलाकार त्यांच्या निश्चित वेळेनुसार शिफ्ट पूर्ण करून घरी निघून जातात. मात्र, सेटवरील शेवटचा दिवा बंद होईपर्यंत स्पॉट बॉईज, लाईटमन, तांत्रिक कर्मचारी आणि इतर मजूर वर्ग काम करत राहतो. चित्रपटसृष्टीचा खरा पाया असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.



"परिस्थिती बदलली नाही तर हिंदी चित्रपटसृष्टी बंद पडू शकते"


कामगारांच्या हक्कांकडे आणि त्यांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष सुरूच राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण उद्योगाला भोगावे लागू शकतात, असा इशारा बी. एन. तिवारी यांनी दिला. "जर परिस्थिती अशीच कायम राहिली, तर एक दिवस संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी (Hindi Film Industry) ठप्प होईल. हजारो कामगार बेरोजगार होतील आणि अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते," अशा शब्दांत त्यांनी आपली चिंता व्यक्त केली. हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगाटामागे रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या कामगारांचे प्रश्न आता ऐरणीवर आले असून, त्यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के