मुंबई : महागाईनं सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच आता इंधन दरवाढीचा (Fuel Price Hike) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अवघ्या १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात वाढ करण्यात आली असून, आज शनिवारी पुन्हा इंधन दरात ८७ आणि ९१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील (International Market) सततच्या घडामोडींमुळे देशात सलग पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे. मेन ...
गेल्या १० दिवसांत झालेली ही तिसरी मोठी दरवाढ मानली जात असून, यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. नव्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत (Petrol Price) आता थेट शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. क्रूड ऑईल मार्केटमधील (Crude Oil Market) चढ-उतार आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे तेल कंपन्यांवर वाढत असलेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी ही दरवाढ करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश; जमीन वाटप आणि परवानग्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई : स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत ...
नव्या इंधन दरांनुसार (Fuel Rates), दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ८७ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आधी ९८.६४ रुपये प्रति लिटर असलेलं पेट्रोल आता ९९.५१ रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेलच्या किमतीतही (Diesel Price) मोठी वाढ करण्यात आली असून, डिझेलच्या दरात प्रति लिटर ९१ पैशांची वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत डिझेलचा दर ९१.५८ रुपयांवरून थेट ९२.४९ रुपयांपर्यंत गेला आहे.
दिल्लीमध्ये पेट्रोल आता अवघ्या ४९ पैशांनी शंभरीपासून दूर आहे. दुसरीकडे, मुंबईसह देशातील अनेक महानगरांमध्ये पेट्रोल दर (Petrol Rate) आधीच १०० रुपयांच्या पुढे गेला असून, आजच्या नव्या वाढीनंतर इंधन आणखी महाग झालं आहे. सततच्या या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे (Petrol-Diesel Price Hike) सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून, आगामी काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





